Thursday, 4 April 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

                 आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

                                                                                         - संजय शिंत्रे 

दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात लोकसभा निवडणूक - २०२४ निमित्त विशेष मुलाखत

 

मुंबईदिनांक 3 : सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांचा वापर करतांना नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेला बाधा येईलअशा प्रकारची कोणतीही पोस्ट न करता दक्षता बाळगावीअसे आवाहन सायबर क्राईम विभागाचे पोलिस उप महानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून केले.


लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सायबर क्राईम विभागाची भूमिका आणि सर्व समाजमाध्यमे हाताळताना घ्यावयाची काळजी’ याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. समाज माध्यमांवरून कुठेही नियमांचे उल्लघंन होणार नाहीयासाठी सायबर क्राईम विभागामार्फत काळजी घेण्यात येत आहे. आचारसंहितेच्या काळात फेसबुकइन्स्टाग्रामएक्स इत्यादी समाज माध्यमांवरून आक्षेपार्ह पोस्टतथ्यहीन माहिती पसरवणेनिवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणे आदीबाबत विभागामार्फत कशा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांची ऑनलाइन होणारी फसवणूक व गुन्हे रोखण्यासाठी सायबर विभागामार्फत कशा प्रकारे दक्षता घेण्यात येत आहेयाविषयी पोलिस उप महानिरीक्षक श्री. शिंत्रे यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे. 


माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात श्री. शिंत्रे यांची मुलाखत गुरूवार दि. ४शुक्रवार दि. ५शनिवार दि. ६ आणि सोमवार दि. ८ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहेतर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. ८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0 0 0 0 0

No comments:

Post a Comment