Wednesday, 3 April 2024

जिल्हा कारागृहात मोफत ‘आयुष्यमान भारत कार्ड” कॅंपचे आयोजन


 जिल्हा कारागृहात मोफत ‘आयुष्यमान भारत कार्ड कॅंपचे आयोजन

जळगाव, दिनांक 3 ( जिमाका ) : जिल्हा कारागृहातील ३०२ कलमातील न्या बंदीसाठी दिनांक 2 एप्रिल, 2024 रोजी मोफत  आयुष्यमान भारत कार्ड” कॅंप घेण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त जळगांव जिल्हा कारागृह अधिक्षक अनिल वांढेकर, वरिष्ठ अधिकारी ग. वि. पाटील व इतर सर्व कर्मचारी उपस्थीत होते.

महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रिद वाक्य "सुधारणा व पुनर्वसन" च्या अंतर्गत अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अभिताभ गुप्ता, यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह व सुधारसेवा डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या प्रेरणेने, तसेच कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग, नाशिक. यु. टी. पवार यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र कारागृह विभाग व समता फाऊंडेशन, मुंबई याचे संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा कारागृहात कॅंप घेण्यात आला.

0 0 0 0 0

No comments:

Post a Comment