Tuesday, 16 April 2024

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची 22 ते 24 एप्रिल पर्यंत त्रुटीची पुर्तता शिबीर

                                             जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची

22 ते 24 एप्रिल पर्यंत त्रुटीची पुर्तता शिबीर

 जळगाव, दिनांक 16 एप्रिल (जिमाका वृत्तसेवा) :

 महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव या कार्यालयामार्फत समता पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार आहे.  दिनांक 10 ते 25 एप्रिल, 2024 या कालावधित समता पंधरवाडा आयोजित करण्यात आलेला आहे.

 जळगाव जिल्हा अतंर्गत शिक्षण घेत असलेल्या इयत्ता वर्ग बारावी विज्ञान तसेच व्यवसायीक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांच्या अर्जांना ऑनलाईन त्रुटी कळविण्यात आलेली असून सदरच्या विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, दिनांक 22 ते 24 एप्रिल, 2024 या कालावधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ, जळगाव येथे त्रुटीची पुर्तता शिबीर आयोजित करण्यात आले असून सदरच्या कालावधित मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या अर्जाबाबत त्रुटीची पुर्तता करण्यात यावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या अर्जांची त्रुटीची पुर्तता करुन निकाली काढण्याची कार्यवाही करण्यांत येईल, या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव येथील समिती सदस्यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकान्वये केले आहे.

0 0 0 0 0 0 

No comments:

Post a Comment