Friday, 26 April 2024

"मलेरिया विरुदध जगाच्या संरक्षणासाठी गतीमान करुया लढा मलेरियाला हरविण्यासाठी " जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल २०२४

     "मलेरिया विरुदध जगाच्या संरक्षणासाठी गतीमान करुया लढा मलेरियाला हरविण्यासाठी "

जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल २०२४

जळगाव,  दिनांक 25 ( जिमाका ) : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांर्गत 25 एप्रिल, 2024 रोजी जागतिक हिवताप दिन संपूर्ण जिल्हा भरात साजरा करण्यात येणार आहे. डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प जळगाव तथा डॉ. तुषार देशमुख जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येणार आहे.

सदरील कार्यक्रमात साचलेल्या पाण्यात गप्पीमासे सोडणे, लहान डबकी बुजविणे, व्हॅन्ट पाईपला जाणी बसविणे, जि.प शाळेत मार्गदर्शन व प्रतिज्ञा वाचणे, व्हॉलगळती काढणे. बस स्टॅन्डवर माहीती देणे, हिवताप हा आजारचे प्रकार ४ असुन १ प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स, २ प्लाझमोडियम फॅल्सीपेरम, ३ प्लाझमोडियम मलेरी ४ प्लाझमोडियम ओव्हेल असुन यापैकी १ प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स व प्लाझमोडियम फॅल्सीपेरम या दोन प्रकारचे रोगजंतु आपल्या विभागात आढळुन येतात. या रोगाचे प्रमुख खादय मानवी रक्तातील तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबीन होय. या रोग जंतुमुळे हिवताप हा आजार होते. सर्वप्रथम सन १८८९ मध्ये डॉ. सर रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञाने रोग जंतुचा शोध लावला. तसेच वरील माहिती जनतेस पोहचविण्याकामी जिल्हा स्तरावरुन देण्यात येणार आहे.

हिवतापाचा प्रसार हिवतापाचा प्रसार अॅनाफेलीस या जातीच्या डासामार्फत होतो. या जातीच्या डासाची मादी घरातील वापरण्यासाठी साठविण्यात आलेल्या पाण्याच्या साठ्यामध्ये, स्वच्छ पाण्याची डबकी, नारणाच्या करवंट्या जुनी टायर्स इ. वस्तुमध्ये साठलेल्या पाण्यामध्ये अंडी घालतात व तेथे त्या अंड्यापासुन नवीन डास उत्पत्ती होऊन अशा प्रकारे डासांची संख्या वाढुन हिवतापाचा प्रसार वेगाने होण्यास मदत होते.

हिवतापाची प्रमुख लक्षणे व दुषपरीणाम हिवतापाचे रोग जंतु मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर यकृत व प्लीहाच्या पेशीमध्ये त्यांची वाढ होते तेथे त्यांचे जिवनचक्र पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागतो. त्यांनतर जेव्हा वरील रोगजंतु रक्तप्रवाहात मिसळुन रक्तातील तांबडया पेशीवर हल्ला करतात त्या रोगजंतुना मारण्यासाठी रुग्णाचे शरीराचे तापमान खुप वाढते. त्यामुळे त्याला भरपुर प्रमाणात थंडी वाजुन येते, रुग्णास मळमळल्या सारखे वाटते काही वेळेस उलट्या होतात, खुप डोके दुखते, नंतर भरपुर घाम येवुन ताप उतरतो व गाढ झोप लागत. पुन्हा २४ तासानंतर ताप येवुन वरील प्रमाणे त्रास होतो. खुप अशक्तपणा जानवतो व रक्तक्षय होण्याची शक्यता असते गर्भवती व बालकांना हितापापासुन सर्वाधीक धोका संभवतो विशेषतः प्लाझामोडीयम फॅल्सीपेरम या जंतुमुळे होणारा हिवताप हा मेंदुज्वर होण्यास कारणीभुत ठरतो. वेळीच समुळ उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते.

राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा हिवताप कार्यालय जळगाव यांच्यामार्फत खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येते.

डास नियंत्रणासाठी उपाययोजना

> किटकनाशक फवारणी हिवताप पारेषण काळात ग्रामिण भागातीत हिवतापासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्त गावामध्ये केओथिन लॅम्डा पावडर किटकनाशकांची घरोघरी फवारणी करतो.

> जिवशास्त्रीय उपाय योजना किटकनाशकामुळे होणाऱ्या प्रदुषणाचा विचार करुन राज्यामध्ये योग्य डासोत्पत्ती स्थानांमध्ये डासअळीभक्षक सोडण्यात येतात. सदर उपाय योजना ग्रामिण तसेच शहरी भागातही राबविण्यात येतात.

कुठल्याही तापाकडे दुर्लक्ष करु नका. हा तापहिवताप असु शकतो

> हा ताप हिवताप तर नाही, याबददल खात्री करुन घ्या.

> औषध विक्रेतांच्या अथवा स्वता च्या अल्प ज्ञानावर तापाकरीता परस्पर औषधी घेवु नका.

> हिवतापाच्या निश्चीत निदानासाठी प्रा.आ. केंद्र व उपकेंद्र स्तरावर तापाच्या रुग्णांच्या रक्तनमुना घेवुन तो सुक्ष्मदर्शकाखाली तपासणी आवश्यक असते.

> हिवताप पसरविणारे डास आपण साठविलेल्या स्वच्छ पाण्यात आढळतात.

> पाण्याच्या टाक्यात डासांची उत्पत्ती होवु नये म्हणुन त्या दुरुस्त करणे, त्यास झाकण बसविणे व गळती थांबविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

> दैनंदिन पाण्याच्या वापराकरीता घरामधील तसेच घराबाहेरील टाकी आठवडयातुन दोनदा पुर्णपणे रिकामी व स्वच्छ करुन पुन्हा भरणे व झाकुन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

> डासांचा उपद्रव पुर्णपणे टाळण्यासाठी पाण्याच्या सर्व पिंपे, टाक्या इ. सर्व साठे डास प्रतिबंधक स्थीतीत आणी व्यवस्थीत झाकुन ठेवणे

> परिसरातील घराजवळील पाण्याची डबकी वेळी बुजवा किंवा वाहती करावी व वाहत नसल्यास साचलेल्या डपक्यात गप्पी मासे कींवा कुड ऑईल टाकावे.

वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही, व डास चावणार नाही, म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासुन दुर ठेवीन त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण होण्यासाठी सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

0 0 0 0 0 0 0 0

अन्न उत्पादक व्यावसायिकांनी वार्षिक परतावा फार्म ऑनलाईन भरावेत

 अन्न उत्पादक व्यावसायिकांनी वार्षिक परतावा फार्म ऑनलाईन भरावेत

जळगाव, दिनांक 25 ( जिमाका ) : अन्न सुरक्षा व मानक कायदा 2006 नियम व नियमन 2011 अंतर्गत अन्न व्यवसाय करणाऱ्या उत्पादकांना आवाहन करण्यात येते की, सन 2023-2024 या महसुल वर्षापसुन वार्षिक परतावा फॉर्म डी -1 मध्ये भरण्यासाठी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर आपला परतावा अर्ज करते वेळीचा युझर आय डी व पासवर्ड वापरुन https://foscos.fssai.gov.in  या सकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने करावयाचा आहे. तसेच अन्न व्यावसायिकांनी संकेतस्थळावर युझरआयडी वा पासवर्ड माहित नसल्यास   https://foscos.fssai.gov.in या संकेत स्थळावर जावुन  forget password or login id  टाकुन नविन  login id व  password generate  करावा व त्यानंतर अन्न व्यावसायिकांचा वार्षिक परतावा फॉर्म डी- १ सादर करावा.

तसेच वार्षिक परतावा भरण्यास काही तांत्रिक अडचणी आल्यास अधिक माहितीसाठी टोल फ्री क्र. 1800112100 अथवा helfdesk-foscos@fssai.gov.in  या ईमेल आयडीवर संपर्क साधावा. डी -1 फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 31 मे, 2024 असुन सदर तारखेनंतर अर्ज करणाऱ्यांना प्रती दिन 100 रुपये या प्रमाणे दंड शुल्क भरावे लागेल याची सर्व उत्पादक आस्थापनांनी नोंद घ्यावी असे आवाहन सहाय्यक आयुक्‍त स. कृ. कांबळे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

0 0 0 0 0 0 0

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक 2024 अखेरच्या दिवसापर्यंत जळगांवसाठी 25 उमेदवारांनी 36 अर्ज तर रावेरसाठी 31 उमेदवारांनी दाखल केले 45 अर्ज

                                   जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक-2024

अखेरच्या दिवसापर्यंत जळगांवसाठी 25 उमेदवारांनी 36 अर्ज तर

रावेरसाठी 31 उमेदवारांनी दाखल केले 45 अर्ज

जळगांव, दिनांक 25 ( जिमाका ) : लोकसभा निवडणूक 2024 चे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दि.25 एप्रिल रोजी  जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी 21 अर्ज भरले तर रावेर साठी 11 उमेदवारांनी 18 अर्ज भरले. गुरुवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शेवटच्या दिवसांपर्यंत जळगांव लोकसभा मतदार संघात एकूण 31 उमेदवारांनी 45 अर्ज दाखल केले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात 25 उमेदवारांनी 36 अर्ज दाखल केले आहेत.

गुरुवार दि 25 रोजी जळगांव लोकसभा मतदार संघांसाठी 03 उमेदवारांनी 06 अर्ज घेतले. तर  रावेर लोकसभा मतदारसंघासाठी  02 उमेदवारांनी 03 अर्ज घेतले. अखेरच्या दिवशी जळगांव लोकसभा मतदार संघांसाठी शैलेश यशवंत देसले यांनी रोहित दिलीप निकम (भारतीय जनता पार्टी) यांचेसाठी 02,अमोल निंबाजी वानखेडे यांनी राजेंद्र समाधान वानखेडे, भुसावळ (अपक्ष) यांचेसाठी 3, प्रतीक सुधाकर राजपूत, पारोळा (अपक्ष) 1 अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदार संघांसाठी प्रभाकर पंढरी साळवे, जामनेर (अपक्ष) 1, ललित गुणाजी बोडे, रावेर (भारतीय जनता पार्टी) 2 अर्ज घेतले.

0 0 0 0 0 0 0

Wednesday, 24 April 2024

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक-2024 सहाव्या दिवशी जळगावसाठी 11 उमेदवारांनी 30 अर्ज तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले जळगांवसाठी 09 उमेदवारांनी 05 अर्ज तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी दाखल केले 11 अर्ज

 















जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक-2024

सहाव्या दिवशी जळगावसाठी 11 उमेदवारांनी 30 अर्ज तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले

जळगांवसाठी 09 उमेदवारांनी 05 अर्ज तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी दाखल केले 11 अर्ज

 जळगाव, दिनांक 24 एप्रिल ( जिमाका ) : लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर सहाव्या दिवशी दि.24एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले. तर  रावेर लोकसभा मतदारसंघासाठी  08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले. तर सहाव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी05 उमेदवारांनी 10 अर्ज दाखल केले. त्यात करण बाळासाहेब पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी 03 अर्ज दाखल केले, अंजली करणं पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी03 अर्ज दाखल केले. डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (वंचित बहुजन आघाडी ) यांनी 02 अर्ज दाखल केले. पाटील संदीप युवराज, अंमळनेर (अपक्ष ), महेंद्र देवराम कोळी, अंमळनेर ( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी)असे एकूण 05 उमेदवारांनी 09 अर्ज दाखल केले.तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अमित हरिभाऊ कोलते, मलकापूर (अपक्ष ) अनिल पितांबर वाघ, जळगांव (अपक्ष), श्रीराम दयाराम पाटील, रावेर (नॅशनलिस्ट काँगेस पार्टी, शरदचंद्र पवार गट )या उमेदवाराने 4 अर्ज, कोमलबाई बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ), श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा (अपक्ष ), संजय पंडित ब्राम्हणे, भुसावळ (अपक्ष )असे 08 उमेदवारांनी 11 अर्ज असे एकूण जळगांव व रावेर दोन्ही लोकसभा मतदार संघात  20 उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल करण्यात आले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी  राजाराम बारकू मोरे, चाळीसगाव (बहुजन समाज पार्टी ) 2, बबलू दगडू सोनवणे, जळगांव (बहुजन समाज पार्टी ) 03 प्रेमलाल कान्हयालाल जैस्वाल, भडगाव यांनी मोहसीन नूर मोहम्मद खान भडगाव (अपक्ष )यांचेसाठी 01,प्रेमलाल कान्हयालाल जैस्वाल, यांनी अब्दुल शकूर देशपांडे, जळगांव ( अपक्ष) यांचेसाठी 01, इरफान मोहम्मद फत्ते मोहम्मद शेख जळगांव (अपक्ष ) 01, अशोक ओंकार सोनवणे, जळगांव (बहुजन समाज पार्टी ) 04, मोहम्मद नूर लतीफ शेख, जळगाव (अपक्ष ) 04, नामदेव पांडुरंग कोळी, जळगांव (अखिल भारत हिंदू महासभा )04, ऍड. राहुल एस अकोलकर, जळगाव यांनी अनिस पांडे, जळगाव (बळीराजा पाटील पार्टी )04 असे एकूण 11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले आहेत. त्यात श्रीमती कोमल बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ) 03, कालिदास दुमन चौधरी, चोपडा (अपक्ष ) 02, संजय अर्जुन चौधरी, रसलपूर ता. रावेर यांनी आकाश संजय चौधरी रा. पुनखेडा ता. रावेर (बळीराजा पार्टी (महाराष्ट्र )04, गणेश सुपडू इंगळे रा. लोहारा ता. रावेर यांनी महेश रामचंद्र तायडे, रा. खानापूर ता. रावेर (भारत मुक्ती मोर्चा संघटना, महाराष्ट्र ) 04, प्रभाकर पंढरी साळवे रा. कुंभारी ता. जामनेर (अपक्ष ) 03, चेतन रमेश शर्मा रा. जळगांव यांनी सागर प्रभाकर पाटील रा. बोदवड (अपक्ष )यांचेसाठी 04,रितेश श्रीराम पाटील रा. पिंप्री नांद्रू ता. मुक्ताईनगर यांनी शेख कुर्बान शेख करीम, फैजपूर ता. यावल (अपक्ष )यांचेसाठी 04, पद्माकर रामचंद्र पाटील, रा चोपडा (अपक्ष) 02 एकूण 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी.करण बाळासाहेब पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी 03 अर्ज दाखल केले, अंजली करणं पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी03 अर्ज दाखल केले. डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (वंचित बहुजन आघाडी ) यांनी 02 अर्ज दाखल केले. पाटील संदीप युवराज, अंमळनेर (अपक्ष ), महेंद्र देवराम कोळी, अंमळनेर ( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी)असे एकूण 05 उमेदवारांनी 09 अर्ज दाखल केले. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी..अमित हरिभाऊ कोलते, मलकापूर (अपक्ष ) अनिल पितांबर वाघ, जळगांव (अपक्ष ), श्रीराम दयाराम पाटील, रावेर (नॅशनलिस्ट काँगेस पार्टी, शरदचंद्र पवार गट )या उमेदवाराने 4 अर्ज, कोमलबाई बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ), श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा (अपक्ष ), संजय पंडित ब्राम्हणे, भुसावळ (अपक्ष)यांनी आपले अर्ज दाखल केले.बुधवारी दिनांक 24 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 05 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 11 असे एकूण 20 अर्ज दिवसभरात दाखल झाले.

0 0 0 0 0 0 

Tuesday, 23 April 2024

जळगाव मतदार संघाचे सर्वसामान्य निरीक्षक आणि जळगाव जिल्ह्यासाठीचे पोलीस निरीक्षक दाखल तिन्ही निरीक्षकांचे संपर्क क्रमांक जाहीर

 

जळगाव मतदार संघाचे सर्वसामान्य निरीक्षक आणि

जळगाव जिल्ह्यासाठीचे पोलीस निरीक्षक दाखल

तिन्ही निरीक्षकांचे संपर्क क्रमांक जाहीर

 जळगाव, दिनांक 23 एप्रिल (जिमाका ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाकरिता सर्वसामान्य निरीक्षक निश्चित करण्यात आले असून गुजरात केडरचे 2004 बॅचचे IAS अधिकारी डॉ.राहुल बाबुलालभाई गुप्ता यांची जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे जळगावांत आगमन झाले आहे.  8275970667 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रारी करू शकतात. तसेच प्रियंका मीना (आय.पी. एस) यांची जळगाव जिल्ह्यासाठी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्याशी 8275970669 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रारी करू  शकतात.  निरीक्षकांसाठी अजिंठा विश्रामगृह येथे स्वतंत्र कार्यालय असणार असून राजकीय पक्ष उमेदवार व मतदार अजिंठा विश्रामगृह येथे असलेल्या कार्यालयात किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधू शकता असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी कळविले आहे

0 0 0 0 0 0 0 0 0

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक-2024 पाचव्या दिवशी जळगावसाठी 07 उमेदवारांनी 10 अर्ज तर रावेरसाठी 09 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले जळगांवसाठी 2 उमेदवारांनी 3 अर्ज तर रावेरसाठी 04 उमेदवारांनी दाखल केले 06 अर्ज

 

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक-2024

पाचव्या दिवशी जळगावसाठी 07 उमेदवारांनी 10 अर्ज तर रावेरसाठी 09 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले

जळगांवसाठी 2 उमेदवारांनी 3 अर्ज तर रावेरसाठी 04  उमेदवारांनी दाखल केले 06 अर्ज

 जळगांव, दिनांक 23 एप्रिल ( जिमाका ) : लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर पाचव्या दिवशी दि.23 एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी

07 उमेदवारांनी 10 अर्ज घेतले. तर  रावेर लोकसभा मतदारसंघासाठी  09 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले. तर पाचव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ललित गौरीशंकर शर्मा या अपक्ष उमेदवाराने 02 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी 01 उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकनाथ नागो साळुंखे,  ( अपक्ष ) कोमलबाई बापूराव पाटील (अपक्ष) जितेंद्र पांडुरंग पाटील, यांनी प्रत्येकी एक तर राहुल रॉय अशोक मुळे (अपक्ष )यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. असे जळगांव व रावेर दोन्ही लोकसभा मतदार संघात एकूण 09 उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल करण्यात आले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 07 उमेदवारांनी 10 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी  स्वामी पांडुरंग पाटील, जळगाव (अपक्ष) 01, रोहन गणेश सोनवणे(अपक्ष ) 01, राहुल शशी कुमार सुरवाडे, जळगांव यांनी युवराज भीमराव जाधव, चाळीसगाव ( वंचित बहुजन आघाडी) यांच्यासाठी 03, नंदू शामराव पाटील (अपक्ष ) 01, महेश सुपडू महाजन, जळगांव ( अपक्ष) 01, प्रा. प्रताप मोहन कोळी,  जळगाव (अपक्ष ) 01, संग्राम सिंग सुरेश सूर्यवंशी जळगाव, (अपक्ष ) 01 असे एकूण 07 उमेदवारांनी 10 अर्ज घेतले आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 09 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत. त्यात युवराज देवसिंग बारेला,  चोपडा (बहुजन समाज पार्टी) 02, जालम सिंग उत्तम सिंग वतपाळ,  नांदुरा( अपक्ष)02, युनूस अब्दुल तळवी यावल यांनी ममता भिकारी तळवी यावल (अपक्ष) यांचेसाठी 02, अमोल गोपाल शिरपूरकर, बोदवड (अपक्ष) 02, दीपक रतिलाल चव्हाण,पाळधी  श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष) 04, दीपक पद्माकर भालेराव, रावेरयांनी संजय अर्जुन चौधरी,रावेर (अपक्ष) 04, अविनाश विष्णू सोनवणे, जळगाव यांनी श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष) यांच्यासाठी 04, योगेंद्र विठ्ठल कोलते, मलकापूर(बहुजन समाज पार्टी ) 02, आनंद जनार्दन तेलंग, मलकापूरयांनी सौ. अनिता योगेंद्र कोलते, मलकापूर (बहुजन समाज पार्टी) 02 असे एकूण 09 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी  जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी ललित गौरीशंकर शर्मा, जळगाव (अपक्ष) या उमेदवाराने 02 अर्ज तर करण बाळासाहेब पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी 01 अर्ज दाखल केला आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना करण पवार यांनी अ आणि ब फॉर्म (A B form) सादर केलेला नाही.असे मंगळवारी जळगांव लोकसभा मतदार संघांसाठी 0 3 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.तर   रावेर लोकसभा मतदारसंघासाठी. एकनाथ नागो साळुंखे ,  (अपक्ष) कोमलबाई बापूराव पाटील (अपक्ष) जितेंद्र पांडुरंग पाटील, यांनी प्रत्येकी एक तर राहुल रॉय अशोक मुळे (अपक्ष) यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी दिनांक 23 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 03 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 06 असे एकूण 09 अर्ज दिवसभरात दाखल झाले.

0 0 0 0 0 0 0 0

Monday, 22 April 2024

बोगस कृषि निविष्ठा विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हयात १६ भरारी पथकांची स्थापना

 

बोगस कृषि निविष्ठा विक्रीला आळा घालण्यासाठी

जिल्हयात १६ भरारी पथकांची स्थापना

 

जळगाव, दिनांक 23 एप्रिल (जिमाका) : खरीप हंगाम २०२४ जवळ येत असल्याने शेतकरी बांधवांना निविष्ठा वेळेवर उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बोगस कृषी निविष्ठांची विक्री होऊ नये याकरीता जिल्हयात १६ भरती पथके तयार करण्यात आलेली असून या पथकांमार्फत बोगस बियाणे, खते व किटकनाशक विक्रीला आळा घालण्यात येणार आहे

कृषि विभागाकडून खरीप हंगाम २०२४ चे नियोजन करण्यात आले असून रासायनिक खते, बियाणे व किटकनाशकांच्या गुणवता नियंणासाठी जिल्हास्तरीय 1 व तालुकास्तरीय 15 असे एकुण 16 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी बाधवांची फसवणूक टळेल व अनाधिकृतरित्या विक्री होणा-या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसण्यास मदत होईल. खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी होते. या कालावधीत शेतक-यांची फसवणूक होऊ नये म्हणुन शेतक-यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणा-या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, बियाणे पाकीटाचा टॅग व लॉट नंबर शेतकऱ्यांनी पडताळून पहावा.

पेरणी झाल्यावर बियाणे पाकिटे पिक निघेपर्यंत जपून ठेवावे, अनधिकृत / बिनाबिलाने बियाणे खरेदी करू नये, किटकनाशक, तणनाशके खरेदी करतांना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी, खत खरेदी करतांना रितसर बिल घ्यावे, जर कुणी खत विक्रेता जास्त दराने युरीया सारख्या अनुदानित खतांची विक्री करीत असेल तर त्याबाबत लेखी तक्रार तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती या कार्यालयास करावी, तसेच एचटीबीटी कापूस वाणाचे अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये. अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी ०२५७-२२३९०५४ किंवा मोबाईल क्रमांक ९८३४६८४६२० यावर माहिती द्यावी, असे आवाहन कु.मु.तडवी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे.

0 0 0 0 0 0 0

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक 2024 चौथ्या दिवशी जळगावसाठी 09 उमेदवारांनी 22 अर्ज तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले जळगांव लोकसभा मतदार संघासाठी 1 अपक्ष व रावेर लोकसभा मतदार संघासाठी 04 अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल

                                             जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक 2024

चौथ्या दिवशी जळगावसाठी 09 उमेदवारांनी 22 अर्ज

तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले

जळगांव लोकसभा मतदार संघासाठी 1 अपक्ष व रावेर लोकसभा मतदार संघासाठी 04 अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल

 

जळगांव, दिनांक 22 एप्रिल ( जिमाका ) : लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर चौथ्या दिवशी दि.22 एप्रिल रोजी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 09 उमेदवारांनी  22 अर्ज घेतले. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी  08 उमेदवारांनी  24 अर्ज घेतले. तर चौथ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी मुकेश मुलचंद कोळी या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी संजय प्रल्हाद कांडेलकर, मुक्ताईनगर (अपक्ष) यांनी 03 उमेदवारी अर्ज दाखल केले. तर प्रवीण लक्ष्मण पाटील, मलकापूर या अपक्ष उमेदवाराने एक अर्ज दाखल केला. असे जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवारी एकूण 05 अर्ज दाखल झाले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 09 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी  सचिन विष्णू घोडेस्वार, जळगाव (अपक्ष) 02, प्रदीप भीमराव मोतीराया चांदसर ता. धरणगाव (अपक्ष) 02,प्रदीप भीमराव मोतीराया यांनी सुनंदाबाई भीमराव मोतीराया (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष) 02, विलास देवराम कोळी, कळमसरे, ता. अंमळनेर (अपक्ष) 04, किरण ब्रिजलाल कोळी,  जळगाव (अपक्ष) 03, दीपक सुखदेव सोनार,जळगाव यांनी लीना शाम पाटील (अपक्ष) 04, ज्ञानेश्वर मगनपुरी गोसावी, जळगाव ( आम जनता पार्टी)  02, इनेश एकनाथ राठोड, लोंजे ता. चाळीसगाव (अपक्ष) 01, गौरव दामोदर सुरवाडे,  जळगाव (अपक्ष) 02  असे एकूण 09 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले आहेत.

04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 08 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत. त्यात मनोज नामदेव चौधरी, भुसावळ (अपक्ष) 02, शेख इम्रान शेख बिस्मिल्ला, मलकापूर (अपक्ष) 04, श्रावण काशिनाथ डहाळे, राजुरा, मुक्ताईनगर (अपक्ष)  02, उमेश दत्तात्रय पाटील, ममुराबाद यांनी रवींद्र प्रल्हादराव पाटील, मानूर,बोदवड (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) यांच्यासाठी 02,राहुल बापू साळुंके, किनगाव यांनी जगन देवराम सोनवणे, भुसावळ (अपक्ष) यांचेसाठी 04, विजय मधुकर साळुंके, किनगाव यांनी सौं. पुष्पाताई जगन सोनवणे, भुसावळ (अपक्ष) यांच्यासाठी  04, गजानन रमेश रायडे, जामनेर (अपक्ष) 04, शेख रमजान शेख करीम, भुसावळ यांनी नाजमीनबी शेख रमजान (सर्व समाज जनता पार्टी) 02 असे एकूण 08 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी मुकेश मुलचंद कोळी , शिरसोली, प्र. न, तालुका जळगाव या अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ यांचेकडे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी चा आपला उमेदवारी अर्ज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी दाखल केला.तर  04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी संजय प्रल्हाद कांडेलकर,  मुक्ताईनगर (अपक्ष) यांनी 03 उमेदवारी अर्ज दाखल केले. तर प्रवीण लक्ष्मण पाटील, मलकापूर या अपक्ष उमेदवाराने एक अर्ज दाखल केला.  सोमवार दिनांक 22 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 01 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 04 असे एकूण 05 अर्ज सोमवारी दिवसभरात दाखल झाले.

0 0 0 0 0 0

जळगांव, रावेर लोकसभा निवडणूक 2024 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करताना छायाचित्राबाबत काळजी घ्यावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

                               जळगांव, रावेर लोकसभा निवडणूक 2024

उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करताना छायाचित्राबाबत काळजी घ्यावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

जळगाव, दिनांक 22 एप्रिल (जिमाका ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ०३ जळगाव व ०४ रावेर लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र  दाखल करण्याचे कामकाज सुरु आहे. नामनिर्देशनपत्रावर एक व त्यासोबत छायाचित्र सादर करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. संभाव्य अडचणी टाळण्यासाठी उमेदवारांनी छायाचित्र सादर करणेबाबत अलीकडील 3 महिन्यात काढलेले छायाचित्र सादर करण्यासोबतच निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले निर्देश पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जा सोबत सादर केलेले छायाचित्र हे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नमूना 7 अ मधील यादीवर व सर्व मतपत्रिका यावर सुद्धा छापण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी छापील छायाचित्रासोबतच छायाचित्राची सॉफ्टकॉपी ०३ जळगाव मतदारसंघाच्या बाबतीत collector.jalgaon@maharashtra.gov.in व राबेर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत adcjalgaon@gmail.com या ईमेल आईडीबर सादर करावी व सोबत उमेदवाराचे नाव नमूद करावे. सॉफ्टकॉपी स्वरुपात उमेदवारांनी ई मेलवर सादर केलेले छायाचित्र हे भारत निवडणूक आयोगाच्या विविध पोर्टलवर तसेच मतपत्रिकेवर छपाईकामी वापरात येणार असल्याने उमेदवारांनी खालील बाबींची दक्षता घ्यावी.

छायाचित्राबाबतच्या महत्त्वाचे मुद्दे :

नामनिर्देशनपत्रावरील छायाचित्र व सॉफ्टकॉपी सारखी असावी. छायाचित्र हे अलीकडील किमान तीन महिने कालावधीतील म्हणजेच अधिसूचनेच्या दिनांकाच्या ०३ महिन्यांच्या कालावधीपूर्वी काढलेले असावे. छायाचित्र हे २ cm x २.५ cm (२ cm रुंदी व २.५ cm उंची) आकाराचे असावे. छायाचित्र काढताना उमेदवाराचा संपूर्ण चेहरा कॅमेऱ्याकडे असावा, डोळे उघडे असावेत व चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसावेत. छायाचित्र हे रंगीन किंवा Black & White असेल तरी चालेल. छायाचित्र हे साधारण कपड्यात काढलेले असावे. कोणताही विशीष्ट पोषाख परिधान केलेला नसावा तसेच टोपी, काळ्या काचेचा चष्मा घातलेला नसावा. छायाचित्र सादर करताना विहित नमुन्यातील घोषणापत्र सोबत सादर करावे.  असे अवाहन आयुष प्रसाद, जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांनी केले आहे. 

0 0 0 0 0 0

विनापरवाना 4 लाख 10 हजारांचा सील बंद पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

 

विनापरवाना 4 लाख 10 हजारांचा सील बंद

पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

जळगाव, दिनांक 22 एप्रिल (जिमाका ) : विनापरवाना सील बंद पिण्याच्या पाण्याची बाटल्यांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती समजल्यावरुन सदर प्रकारास आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. शरद म. पवार, सहायक आयुक्त श्री. संतोष कृ. कांबळे  व मा.सह आयुक्त,(नाशिक विभाग) श्री सं.भा.नारगुडे  यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील एमआयडीसी परिसरातील ढोर मार्केट येथे मे. देवांश सेल्स या पेढीवर धाड टाकण्यात आली.

या पेढीकडे आवश्‍यक अन्न परवाना नसताना सुद्धा जळगाव शहरात व जिल्हयात सील बंद पिण्याच्या पाण्याची बाटल्याची (उत्पादक प्रामुख्याने  गुजरात जिल्हयातील) विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. या पेढी मध्ये 4 लाख 10 दहा ऐंशी किमतीचा पाण्याच्या बाटल्यांचा अन्न सुरक्षा मानके कायदयान्वये साठा जप्त करण्यात आला.

 जळगाव जिल्हयातील सर्व अन्न व्यावसाईकांना कळविण्यात येते की, कोणताही अन्न व्यवसाय  करण्याआधी अन्न परवाना/नोंदणी प्राप्त करुन घ्यावी असे सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव यांनी ऐका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0 0 0 0 0 

आता जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक आठवडी बाजारात मतदार सुविधा केंद्र उभारणे सुरु ; 8 मे पर्यंत ही सुविधा होणार उपलब्ध

 







आता जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक आठवडी बाजारात मतदार सुविधा केंद्र उभारणे सुरु ; 8 मे पर्यंत ही सुविधा होणार उपलब्ध

जळगाव, दिनांक 22 एप्रिल ( जिमाका ) : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात आठवडे बाजार असलेल्या प्रत्येक गावी 'मतदार सुविधा कक्ष' स्थापन केली जात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार बाजाराच्या दिवशी हे मतदार सुविधा केंद्र उभारून मतदारांना मतदान विषयीक सर्व माहिती द्यायची आहे.

त्यात मतदानापूर्वी आपली मतदार यादीत नाव कसे बघायचे, स्लिप कशी काढायची,पुराव्यासाठी 12 पैकी कोणतेही एक असेल तर ते गृहीत धरले जाते. याबाबतही त्यांना अवगत करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे सुविधा केंद्र 8 मे पर्यंत उभारले जाणार आहेत.

मतदान सुविधा केंद्र उभारून  जनजागृती बाबतचे आदेश सुरु केल्यानंतर पारोळा, जळगाव, चोपडा येथील रविवार आठवडे बाजारात सुविधा केंद्र उभारून मतदारांना सविस्तर माहिती दिली.

याबाबत ०३-जळगांव लोकसभा मतदार संघासाठी लोकसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच दिनांक १३ मे, २०२४ रोजी १६ एरंडोल विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे.

मतदार सुविधा कक्ष स्थापन करून त्याव्दारे बाजारात येणाऱ्यासर्व मतदारांना निवडणुक विषयक माहिती उपलब्ध करून द्यायची आहे त्यातमतदान केंद्राचा तपशिल, मतदार यादीतील मतदाराचा अनुक्रमांक शोधुन देणे तसेच त्यासाठी उपयुक्त असलेले वोटर हेल्पलाईन अँप बाबत मतदारांना माहिती देणे, मतदारांना मतदानासाठी आवश्यक असलेले १२ पुरावे कोण-कोणते आहेत त्याची माहिती देण्याबाबत जनजागृती करायची आहे.

0 0 0 0 0

Sunday, 21 April 2024

मतदान केंद्रावर नियुक्त आदेश रद्द करण्यासाठी 732 जणांचे अर्ज; अर्ज पडताळणीनंतर 421 जणांचे मान्य, 311 अमान्य

 

मतदान केंद्रावर नियुक्त आदेश रद्द करण्यासाठी 732 जणांचे अर्ज; अर्ज पडताळणीनंतर 421 जणांचे मान्य, 311 अमान्य

जळगाव, दिनांक 21 एप्रिल ( जिमाका ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने मतदान बूथवर नेमणूक केलेल्या जामनेर, चाळीसगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगाव व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण 732 अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून विविध अपरिहार्य कारणासाठी नेमणूक रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती. त्या कारणाची पडताळणीत करून 421 जणांची नेमणूक रद्द करण्यात आली तर 311 जणांच्या विनंती अमान्य करण्यात आल्या आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्हाभरातील शासकीय कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. यापैकी जामनेर, चाळीसगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगाव व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण 732 कर्मचाऱ्यांचे विविध गंभीर कारणास्तव निवडणूक ड्युटी रद्द करणे बाबतचे विनंती अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले होते.त्यापैकी 421 कर्मचाऱ्यांचे निवडणूक ड्युटी आदेश पडताळणी केल्यानंतर रद्द करण्यात आले आहेत तर 311 अर्ज प्रस्तावित करण्यात आलेले नाहीत. निवडणूक ड्युटी आदेश रद्द केलेल्या 421 जणांमध्ये प्लॅनिंग आणि रिपोर्टिंग ऑफिसर ( पीआरओ ) 88, प्रथम निवडणूक अधिकारी 77 ( एफपीओ ) आणि 252 ओपीओ आणि 4 मतदान कर्मचारी यांचा समावेश आहे.

0 0 0 0

जिल्ह्यातील 20 राष्ट्रीयकृत, खाजगी बँका 120 मतदान केंद्राच्या सजावटीसाठी आल्या पुढे आदर्श मतदान केंद्र तसेच काही मतदान केंद्र दिव्यांग, युवक आणि महिला यांच्याकडून चालवले जाणार

 

जिल्ह्यातील 20 राष्ट्रीयकृत, खाजगी बँका 120 मतदान केंद्राच्या सजावटीसाठी आल्या पुढे

आदर्श मतदान केंद्र तसेच काही मतदान केंद्र दिव्यांग, युवक आणि महिला यांच्याकडून चालवले जाणार

 जळगाव, दिनांक 20 एप्रिल ( जिमाका ) : निवडणूक आयोगाच्या सूचनेननुसार जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात आदर्श मतदान केंद्र 55, दिव्यांगांकडून 21, युवकांकडून 11 आणि महिलांकडून 33 मतदार केंद्र चालवले जाणार असून ते अत्यंत आकर्षक पद्दतीने सजवली जातील. त्यासाठीचा आर्थिक भार जिल्ह्यातील 20 राष्ट्रीयकृत, खाजगी बँका राष्ट्रीय दायित्व म्हणून स्विकारत आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व बँकांना हे आवाहन केले होते.

लोकसभा निवडणूक अधिक समावेशक आणि महिला, दिव्यांग बांधव, युवक इत्यादी सर्व नागरिकांसाठी सहभागी होण्यासाठी आयोगाने अलीकडच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये विविध नवीन उपक्रम हाती घेतले.  स्त्री-पुरुष समानता आणि निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा अधिक रचनात्मक सहभाग याच्या प्रति वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, आयोग वेळोवेळी निर्देश जारी केलेले असून सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे, सर्व दिव्यांग व्यवस्थापित मतदान केंद्रे व सर्व तरुण व्यवस्थापित मतदान केंद्रे स्थापन करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या नुसार जिल्ह्यात आदर्श मतदान केंद्रासह एकूण 120 मतदान केंद्र निर्माण केले जाणार आहेत. ते अत्यंत आकर्षक पद्दतीने सजवली जाणार आहेत.

 

अग्रणी बँक व्यवस्थापक प्रणव कुमार झा म्हणाले,  जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँकांमध्ये त्यांच्या संख्येनुसार त्यांना आवाहन केले होते. स्थानिक शाखा प्रमुखांना मुख्यतः शाखेपासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या केंद्राला भेट देण्याची सूचना केली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सगळ्या आदर्श मतदान केंद्राना तसेच विशेष मतदान केंद्राना सारखेपणा यावा याचे नियोजन केले जात असून नियोजन पूर्ण होताच संबधित बँकांकडे दिले जाईल. त्यानुसार ती व्यवस्था करतील.

कशी असेल सजावट

मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी एक आकर्षक कमान उभारलेली असेल, त्यानंतर 10 x 15 आकाराचा मंडप उभारला जाईल, खाली रेड कार्पेट असेल, सगळीकडे फुलाची सजावट असेल, एक सेल्फी पॉईंट असेल, फ्लेक्स लावले जातील अशी माहितीही झा यांनी दिली.

या बँकाचा आहे सहभाग सेंट्रल बँक ऑफ इंडिया,स्टेट बँक ऑफ इंडिया, एच.डी.एफ.सी बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, आय सी आय सी आय बँक, आय डी बी आय बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक,येस बँक,बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युको बँक, आय डी एफ सी प्रथम बँक, भारतीय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक या बँका पुढे आल्या आहेत. या सर्व बँकानी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महोत्सवात पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष कौतुक केले आहे.

00 00 00 00

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक-2024 तिसऱ्या दिवशी जळगावसाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज तर रावेरसाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 1 अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल

 

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक-2024
तिसऱ्या दिवशी जळगावसाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज तर रावेरसाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले
जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 1 अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल


जळगाव, दिनांक 20 एप्रिल ( जिमाका ) : लोकसभा निवडणूक-2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दिनांक 20 एप्रिल रोजी 03-जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले. तर 04-रावेर लोकसभा मतदारसंघासाठी  7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले. तर तिसऱ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी संजय माळी या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 20 एप्रिल, 2024 रोजी  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी  मनोज गौरीशंकर शर्मा, जळगाव ( अपक्ष)4, ललित गौरीशंकर शर्मा यांनी श्रीमती तेजस्विनी ललित शर्मा जळगाव( अपक्ष) यांच्यासाठी 4, पंकज दत्तात्रय पवार, कन्नड यांनी श्रीमती स्मिता उदय वाघ डांगर तालुका अमळनेर( भारतीय जनता पार्टी) यांच्यासाठी 4,  अनिल विश्वासराव मोरे, जळगाव यांनी सतीश विश्वासराव मोरे जळगाव( अपक्ष) यांच्यासाठी4, दिगंबर अशोक सोनवणे जळगाव( अपक्ष)1, किरण उत्तमराव वारुळे अमळनेर यांनी श्रीमती स्मिता उदय वाघ डांगर तालुका अमळनेर( भारतीय जनता पार्टी) यांच्यासाठी 4, नुरेजमील इसाभाई पटेल, जळगाव (अपक्ष )1, राजेंद्र सुभाष खरे, पळासखेडे तालुका जामनेर( बहुजन मुक्ती पार्टी)4, जितेंद्र भागवत केदार जळगाव( अपक्ष)1, दिलीप वसंत मराठे, जळगाव( अपक्ष)1, सचिन विष्णू घोडेस्वार, जळगाव( अपक्ष)2, धरमपाल हरिभाऊ इंगळे,  मलकापूर( बहुजन समाज पार्टी)2, विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा यांनी अनिल गंभीर मोरे, बोदवड( अपक्ष) यांच्यासाठी 2 असे एकूण तेरा उमेदवारांनी 35 अर्ज घेतले आहेत.

04-रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले आहेत. त्यात रामेश्वर मनोहर लोहार,  बोदवड( हिंदुस्तान जनता पार्टी) 4, भिवराज रामदास रायसिंगे,चोपडा (अपक्ष ) 2, वसंत शंकर कोलते, जामनेर (अपक्ष )4, कुंदन टोपलू तायडे,  यावल( अपक्ष)2, शेख आबीद शेख बशीर, मलकापूर (अपक्ष )2, एकनाथ नागो साळुंके उर्फ अण्णासाहेब साळुंके, जामनेर ( अपक्ष)2, विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा ( बहुजन समाज पार्टी) 3 असे एकूण 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी 03-जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी संजय एकनाथ माळी, हनुमान नगर धरणगाव तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी 03-जळगाव लोकसभा मतदारसंघ यांचेकडे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी चा आपला उमेदवारी अर्ज शनिवार, दिनांक 20 एप्रिल, 2024 रोजी दाखल केला.तर शनिवारी 04-रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

0 0 0 0 0

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक-2024 दुसऱ्या दिवशी जळगावसाठी 25 उमेदवारांनी 60 अर्ज तर रावेरसाठी 17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले एकही अर्ज दाखल नाही

 

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक-2024
दुसऱ्या दिवशी जळगावसाठी 25 उमेदवारांनी 60 अर्ज तर रावेरसाठी 17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले एकही अर्ज दाखल नाही

जळगाव, दिनांक 19 एप्रिल ( जिमाका ) : लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.19 एप्रिल रोजी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 25 उमेदवारांनी 60 अर्ज घेतले. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी  17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले. तर दुसऱ्या दिवशी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 25 उमेदवारांनी 60 अर्ज घेतले आहेत.

03-जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी  रोप खान कादिर खान, मालेगाव यांनी आयुष्या सिद्धीका रऊफ खान,  मालेगाव ( भारतीय टायगर सेना)2, रौफ खान कादिर खान,  मालेगाव ( भारतीय टायगर सेना)1, राऊफ खान कादिर खान यांनी रहमत बी कादर खान,  मालेगाव ( भारतीय टायगर सेना) यांच्यासाठी 1, महेंद्र देवराम कोळी कळमसरा तालुका अमळनेर ( प्रबुद्ध रिपब्लिक पार्टी)3, योगेश सुखदेव बाविस्कर आसोदा, यांनी प्रभाकर गोविंदा सोनवणे जळगाव( अपक्ष)4, प्रदीप शंकर आव्हाड जळगाव( अपक्ष)3, राजेश हरी सपकाळे, मोहाडी ( अपक्ष)1, मुकेश तुळशीराम महाले जळगाव यांनी करण बाळासाहेब पाटील पारोळा( शिवसेना उ. बा.  ठाकरे) यांच्यासाठी 4 मुकेश तुळशीराम महाले जळगाव यांनी श्रीमती अंजली करण पाटील पारोळा( शिवसेना उ. बा. ठाकरे ) यांच्यासाठी 4 अरुण रोहिदास जगताप धुळपिंपरी तालुका पारोळा, ( अपक्ष) 4, युवराज प्रकाश बारी जळगाव( अपक्ष)2, डॉ. प्रमोद हेमराज पाटील,  भडगाव (भाजपा 1,  अपक्ष 1) निळकंठ प्रकाश पाटील, भातखंडे तालुका पाचोरा ( अपक्ष)1, निळकंठ प्रकाश पाटील भातखंडे यांनी सौ वैशाली निळकंठ पाटील ( अपक्ष) यांच्यासाठी 1,  जळगाव ( अपक्ष-1,  बहुजन विकास आघाडी -1), गणेश हिंमत पाटील तळई तालुका एरंडोल( अपक्ष-1,  वंचित बहुजन आघाडी-1), नामदेव पर्वत पाटील जळगाव यांनी सुनील दत्तात्रय पवार,  जळगाव( अपक्ष)2, राहुल नारायण बनसोडे भुसावळ ( बहुजन समाज पार्टी) 4, आत्माराम मांगो सूर्यवंशी जळगाव यांनी मेघना आत्माराम सूर्यवंशी(अपक्ष ) यांच्यासाठी 2, डॉ. आशिष सुभाष जाधव, जळगाव ( अपक्ष)2, ऍड. वासुदेव धोंडू वारे,  कासोदा ( अपक्ष) 2, मुकेश मुलचंद कोळी,  शिरसोली( अपक्ष) 1, विजय बाबुलाल दानेज, जळगाव ( अपक्ष) 4, अंकित मुकुंद कासार, जळगाव यांनी कुलभूषण विरभान पाटील जळगाव ( अपक्ष) यांच्यासाठी 4, मांगो पुंडलिक पगारे,  भडगाव (बहुजन महा पार्टी) 2 असे एकूण 25 उमेदवारांनी 60 नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत.

04-रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले आहेत. त्यात संजय कुमार लक्ष्मण वानखेडे,  भुसावळ( रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( सोशल)2, अनंत वसंत बागुल,  जळगाव( अपक्ष)2, भिकनराव तानकु बाविस्कर, लासुर तालुका चोपडा, ( अपक्ष)4, प्रवीण समाधान पाटील, रावेर यांनी श्रीराम दयाराम पाटील,  रावेर( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) यांच्यासाठी4, योगेश सुखदेव बाविस्कर आसोदा, यांनी नितीन प्रल्हाद कांडेकर कोल्हाळा तालुका मुक्ताईनगर( अपक्ष)4, रामदास संपतराव कटक, नांदुरा तालुका नांदुरा( अपक्ष)2, श्रीमती कोमल बापूराव पाटील चहार्डी तालुका चोपडा( अपक्ष)1,  अशोक त्र्यंबक इंगळे उचंदा( भूमी मुक्ती मोर्चा)4, शिवाजी रामदास पाटील जळगाव यांनी श्रीमती शितल समर्थ अंभोरे अकोला ( अपक्ष) यांच्यासाठी 2, हर्षल राजेंद्र जैन, नशिराबाद यांनी संतोष भाऊ शबिंदास चौधरी भुसावळ ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांच्यासाठी 4, आत्माराम मांगो सूर्यवंशी जळगाव (अपक्ष )यांचेसाठी 2, राहुल नारायण बनसोडे, भुसावळ (बहुजन समाज पार्टी )3, डॉ. आशिष सुभाष जाधव, जळगांव (अपक्ष )2, विजय प्रभाकर पवार, भुसावळ, यांनी संजय पंडित ब्राह्मणे,  भुसावळ ( वंचित बहुजन आघाडी) यांच्यासाठी 2, बबन मुरलीधर कांबळे भुसावळ यांनी श्रम विभाग भानुदास पाटील फैजपूर( वंचित बहुजन आघाडी)2, शेख कुरबान शेख करीम,  फैजपूर(एम आय एम )4, युसुफ खान युनूस खान, जळगाव यांनी गयासुद्दीन रसोफुद्दीन काझी,  रावेर ( अपक्ष) यांच्यासाठी 2 असे एकूण 17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ व 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.

0 0 0 0