निवडणूक
कामासाठी लागणारे
विविध
परवाने मिळणार एक खिडकी कक्षात
:
प्रातांधिकारी शरद पवार
चाळीसगाव दि. 29 (उमाका
वृत्तसेवा) : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक-2016 च्या अनुषंगाने
निवडणूक कामी विविध शासकीय विभागांमार्फत लागणारे परवाने तसेच ना-हरकत दाखले एकाच
ठिकाणी मिळण्यासाठी तहसिल कार्यालय, चाळीसगांव येथे एक खिडकी कक्षाची स्थापना
करण्यात आली आहे. या कक्षाचे प्रमुख नायब तहसिलदार जी.आर.वाघ तर सहाय्यक म्हणून
श्रीमती के.बी.परदेशी, निलेश अहिरे, मंडलीक यांची नेमणूक निवडणूक निर्णय
अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी शरद पवार
यांनी केली आहे.
प्रादेशिक
परिवहन विभाग, नगर परिषद, पोलीस स्टेशन चाळीसगांव, पंचायत समिती या विभागातील प्राधिकृत अधिकारी, कर्मचारी या
एक खिडकी कक्षात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून विविध विभागामार्फत देण्यात
येणारे परवाने जसे वाहन परवाना, बॅनर, होर्डींग, प्रचार सभा, रॅली आदींसाठी
लागणा-या परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार असल्याने वेळेचा अपव्यय व गैरसोय टाळण्यास
मदत होणार आहे. या एक खिडकी कक्षाचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा असे आवाहनही
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी शदर पवार यांनी केले आहे.
तहसिल कार्यालयात आदर्श आचार संहिता कक्षाची स्थापना
आदर्श आचार संहितेसंदर्भातील
मार्गदर्शन व तक्रारींचे निराकरणासाठी तहसिल कार्यालयात आदर्श आचारसंहिता कक्षाची
स्थापना करण्यात आली असून या कक्षाचे प्रमुख निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे
काम पाहणार असून या कक्षाचा दुरध्वनी क्रमांक 02589-222831 असा आहे. तरी आदर्श
आचार संहितेसंदर्भातील मार्गदर्शन अथवा तक्रारी करिता या कक्षाशी संपर्क साधावा
असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी शरद पवार यांनी केले आहे.
* * * * * * *
*
No comments:
Post a Comment