Thursday, 27 October 2016

धनत्रयोदशी सुटीच्या दिवशी नामनिर्देशन स्विकारण्यात येणार

धनत्रयोदशी सुटीच्या दिवशी नामनिर्देशन स्विकारण्यात येणार
          जळगाव, दि. 27- जळगाव जिल्ह्यातील 12 नगर परिषद व 1 नगर पंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरु असुन दि. 29 ऑक्टोबर 2016 पावेतो नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी दि. 28 ऑक्टोबर 16 रोजी धनत्रयोदशी निमित्त जळगाव जिल्हयासाठी स्थानिक सुटी जाहिर केली असली तरी मा. राज्य निवडणुक आयोगाने या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्याबाबत सूचित केले आहे. त्यामुळे  नगर परिषद / नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची नामनिर्देशपत्रे संबधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे स्विकारण्यात येतील, असे जिल्हा प्रशासन अधिकारी जळगाव तथा सहा. नोडल ऑफिसर (न.प. निवडणुक) यांनी कळविले आहे.
०००००

No comments:

Post a Comment