सर्व
सेवानिवृत्ती वेतनधारकांनी बायोमेट्रिंक
पद्धतीने जीवनप्रमाणपत्र
व हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे
जळगाव, दि. 27 - जळगाव
कोषागारातुन निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासनाचे निवृत्ती वेतन धारक, कुटुंब
निवृत्ती वेतन धारक, इतर राज्याचे शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतन
धारक तसेच इतर राज्याचे निवृत्तीवेतन धारक यांना कळविण्यात येते की, दरवर्षी 01
नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्ती वेतन धारकांना हयातीचा दाखला कोषागारात सादर करणे
आवश्यक आहे. वित्त विभाग शासन निर्णय दि.
15 जानेवारी 2016 अन्वये राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारक, कुटुंबनिवृत्तीवेतन धारक
यांना बायोमेट्रिक पद्धतीने बोटाचे ठसे व आधारकार्ड लिंक करुन जीवनप्रमाणपत्र
पोर्टलद्वारे / मोबाईलद्वारे करण्याची सुविधा जिल्हा कोषागार कार्यालय तसेच तालुका
उपकोषागार कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच पूर्वी प्रमाणे
बँकेमार्फत हयातीचे दाखले देण्याचीही कार्यवाही करावयाची आहे. तरी सर्व निवृत्ती
धारकांनी जिल्हा कोषागार कार्यालय, तालुका उपकोषागार कार्यालयात जीवनप्रमाणपत्र
बायोमेट्रिंक पद्धतीने जीवनप्रमाणपत्र सादर करावे. तसेच दि. 01 नोव्हेंबर 2016
रोजी निवृत्तीवेतन बँकेमार्फत घेतांना बॅकेत हयातीचे प्रमाणपत्र स्वाक्षरी करुन सादर करणे आवश्यक
आहे. निवृत्तीवेतन धारकांनी वरील दोन्ही पध्दतीने जीवन प्रमाणपत्र व हयातीचा
दाखल्याबाबत कार्यवाही करावी. दोन्ही
पध्दतीने जीवनप्रमाणपत्र व हयातीचे प्रमाणपत्राशिवाय डिसेंबर 2016 पासून
निवृत्तीवेतन अदा होणार नाही, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी शि.बा.नाईकवाडे यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment