राज्यातील नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांना लाभणार
कोरियाचे आधुनिक तंत्रज्ञान
-मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक
विकसित राज्य आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात नागरी विकासाचे प्रकल्प सुरु आहे. या
प्रकल्पांमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूतसोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी कोरियाच्या
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा राज्याला उपयोग होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनात त्यांच्या उपस्थितीत आज सार्वजनिक
बांधकाम विभाग व कोरिया लॅन्ड ॲन्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन (KLHC) यांच्यात राज्यातील नागरी पायाभूत प्रकल्पांना
सहकार्यकरण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री
प्रवीण पोटे-पाटील, मदन येरावार, भारतातील
कोरियाचेराजदूत किम साँग वून, कोरीया लॅन्ड ॲन्ड हाऊसिंग
कॉर्पोरेशन (KLHC) व्यवस्थापकीय संचालक ली की येओल, संचालक सॉन यँग हून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान
सचिव आशिषकुमार सिंह, सचिव (बांधकाम) सी. पी. जोशी, सचिव (रस्ते) एस. बी. तामसेकर आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने राज्यात नागरी विकासाचे विविध
प्रकल्प सुरु आहेत. महाराष्ट्र हे विकसित राज्य असल्याने जगातील अनेक देशांनी
राज्यातील या विविध विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दिली आहे.
त्याचबरोबर या प्रकल्पांना सहकार्य करण्यासाठी अनेक देश स्वत:हून पुढे येत आहेत.
कोरिया सरकारच्या सहकार्याने कोरिया लॅन्ड ॲन्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन (KLHC) ने राज्यातील स्मार्ट सिटी, मुंबई-नागपूर सुपर
कम्युनिकेशन एक्सप्रेस वे वर उभारण्यात येणारी 24 हरित शहरे, बांद्रा शासकीय वसाहतीचा पुर्नविकास आणि राज्यातील रस्ते व पुलांचा विकास
या प्रकल्पांना आधुनिक तंत्रज्ञान पुरविण्याचे ठरविले आहे ही महत्वपूर्ण बाब आहे.
त्यांच्या या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कोरिया सरकारचे व कंपनीचे अभिनंदन
केले. भविष्यातही राज्यातील विविध विकास प्रकल्पांसाठी कोरिया सरकारचे सहकार्य
लाभेल अशी अपेक्षाही व्यक्त केली.
यावेळी भारतातील कोरीयाचे राजदूत किम साँग वून म्हणाले की, कोरिया सरकार महाराष्ट्र राज्यातील विविध विकास
प्रकल्पांना नागरी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान
उपलब्ध करुन देईल.
राज्य शासनाच्या वतीने प्रधान सचिव आशिषकुमार सिंह आणि कोरिया लॅन्ड ॲन्ड
हाऊसिंग कॉर्पोरेशन (KLHC) च्या वतीने व्यवस्थापकीय
संचालक ली की येओल यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
000000
No comments:
Post a Comment