जळगाव दि. ०६ ( जिमाका ): छत्रपती संभाजीनगर क्षेत्र संबंधीत टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही अशा तक्रारींच्या निराकरणासाठी पोस्टमास्तर जनरल, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या डाक अदालत विशेषतः टपाल वस्तु / मनी ऑर्डर / बचत बैंक खाते / प्रमाणपत्र इत्यादी बाबत तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीला सह केलेला असावा. (उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुददा इत्यादी)
नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतीत अ.ख.शेख, सहाय्यक निदेशक डाक सेवा (ज. शि) पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, औरंगाबाद -४३१००२ या पत्त्यावर ०७ मार्च २०२५ पूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. प्रपत्र महाराष्ट्र टपाल सर्कलच्या वेबसाईटवर www.maharashtrapost.gov.in उपलब्ध आहे. असे छत्रपती संभाजीनगर क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment