जळगाव दि. 18 ( जिमाका वृत्तसेवा )- जिल्हा महिला व बाल रुग्णालय मोहाडी जळगाव येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील व वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने सोमवार दिनांक १० मार्च रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय मोहाडी जळगाव येथे डॉ. चंदन महाजन (एम.डी. स्त्रीरोग तज्ञ) जळगाव व टिमने महिलेवर दुर्बिणीद्वारे अत्यंत गुंतागुंतीचे गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया (LAVH) यशस्वीरीत्या पार पडली.
त्यांना शस्त्रक्रिया विभागातील परिसेविका वैशाली पाटील, तुळसा माळी अधिपरिचारीका, दिपाली बढे अधिपरिचारीका, वैशाली भालेराव अधिपरिचारीका व शस्त्रक्रिया विभागातील सर्व कक्षसेवक व इतर कर्मचारी यांनी मदत केली.
मोहाडी येथील महिला व बाल रुग्णालयात दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया जसे गर्भपिशवी काढणे, अपेंडिक्स काढणे, हर्निया दुरुस्ती या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामुल्य होतात तरी जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसंबधी मदतीसाठी श्री. चेतन परदेशी ९०६७५३१९२३ व श्री. राहुल पारचा ९६७३६३९७४१ यांना संपर्क साधावा असे आवाहन डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी जिल्ह्यातील रुग्णांना केलेले आहे.
No comments:
Post a Comment