Monday, 10 March 2025

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या राज्यातील अंमलबजावणी


                      जलयुक्त शिवार योजना २’ अंतर्गत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीबाबत ए.टी.ई.चंद्रा फाउंडेशन व मृद आणि जलसंधारण विभाग यांच्यात मंत्रालयात सामंजस्य करार झाला. योजनेच्या सहकार्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाउंडेशनच्या अमित चंद्रा यांना पत्राद्वारे विनंती केली होती. सामंजस्य करारावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, उपसचिव हरीभाऊ गीते, अवर सचिव प्रकाश पाटील यांच्यासह ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशनचे गायत्री नायर लोबो, अमृता के आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment