Saturday, 29 March 2014

उमेदवाराने निवडणूक खर्चविषयक स्वतंत्र व योग्य लेखे ठेवणे आवश्यक : सहा.खर्च निरीक्षक ईश्वर घोडे



उमेदवाराने निवडणूक खर्चविषयक
स्वतंत्र व योग्य लेखे ठेवणे आवश्यक !
                                  : सहा.खर्च निरीक्षक ईश्वर घोडे

            चाळीसगाव, दिनांक 29 मार्च :- लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 77 (1) नुसार नामनिर्देशनापासून ते निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या कालावधीसाठी प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्चविषयक स्वतंत्र व योग्य लेखे ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सहाय्यक खर्च निरीक्षक ईश्वर घोडे यांनी तहसिल कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन 2014 च्या पार्श्वभुमीवर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांनी स्थापन केलेले फिरते भरारी पथक, खर्च संनियंत्रण कक्ष, स्थिर सर्व्हेक्षण पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक, व्हिडीओ पहाणी पथक, लेखा पथक, आदर्श आचारसंहिता कक्ष यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचा-यांची आढावा बैठक आज तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.
            या बैठकीला सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, निवासी नायब तहसिलदार व्हि.पी.सुर्यवंशी आदि उपस्थित होते.
            लोकसभा निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेच्या उल्लघनाबाबत तक्रार करण्यासाठी तहसिल कार्यालयात स्वतंत्र आदर्श आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली असून नानासाहेब आगळे हे कक्ष प्रमुख आहेत तसेच येथे संपर्क करण्यासाठी 02589-224022 हा क्रमांक असुन नागरिकांना आचार संहितेबाबत काही तक्रारी असल्यास या कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रातांधिकारी मनोज घोडे यांनी यावेळी केले आहे. तसेच या कक्षात स्वतंत्र एक खिडकी कक्ष असुन प्रचार सभांसाठी परवानगी, प्रचारासाठी वाहन परवाना, सभा बैठकांना परवानगी घेणे या प्रकारचे कामकाज होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            वरील सर्व पथक व कक्षामध्ये नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचा-यांनी  दैनंदिन अहवाल लेखा पथकाकडे तर लेखा पथकाने जिल्हास्तरीय लेखाकन पथकाकडे सहाय्यक खर्च निरीक्षकांमार्फत निर्धारीत वेळेवर सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात
           

* * * * * * * *

Friday, 28 March 2014

(03) - जळगाव लोकसभा मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम

(03) - जळगाव लोकसभा मतदार संघाचा
निवडणूक कार्यक्रम

        जळगाव, दि. 28 :- (03) - -जळगाव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. 29 मार्च, 2014 पासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहे. दि. 5 एप्रिल, 2014 पर्यंत सार्वजनिक सुटी व्यतिरीक्त सकाळी 11-00 ते दुपारी 3-00 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही सूचकाला, निवडणूक निर्णय अधिकारी, जळगाव लोकसभा मतदार संघ किंवा श्री.अभिजित भांडे पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग जळगाव  यांचेकडे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी  (03) -  जळगाव  लोकसभा मतदार संघ यांच्या कार्यालयात दाखल करता येईल.  नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील.
            नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 7 एप्रिल, 2014 रोजी सकाळी 11-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे निवडणुक निर्णय अधिकारी (03)  जळगाव लोकसभा मतदार संघ यांचे कार्यालय, येथे करण्यात येईल  उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही सूचकाला किंवा (उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या) निवडणूक प्रतिनिधीला वरील निर्देशित कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात दि. 9 एप्रिल, 2014 रोजी दुपारी 3-00 वाजेपर्यंत देता येईल. निवडणूलढविली गेल्यास दि. 24 एप्रिल, 2014 रोजी सकाळी 7-00 ते सायंकाळी    6-00 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असे (03)  जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी   श्रीमती रुबल अग्रवाल यांनी कळविले आहे.

* * * * * * * * *

(04) रावेर लोकसभा मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम

(04) रावेर लोकसभा मतदार संघाचा
निवडणूक कार्यक्रम

        जळगाव, दि. 28 :- (04) - रावेर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. 29 मार्च, 2014 पासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहे. दि. 5 एप्रिल, 2014 पर्यंत सार्वजनिक सुटी व्यतिरीक्त सकाळी 11-00 ते दुपारी 3-00 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही सूचकाला, निवडणूक निर्णय अधिकारी, (04) - रावेर लोकसभा मतदार संघ किंवा श्री. विकास गजरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव यांचेकडे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी  (04) - रावेर लोकसभा मतदार संघ यांच्या कार्यालयात दाखल करता येईल.  नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील.
            नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 7 एप्रिल, 2014 रोजी सकाळी 11-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे असलेल्या  निवडणुक निर्णय अधिकारी (04) -रावेर लोकसभा मतदार संघ यांच्या कार्यालयात होईल  उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही सूचकाला किंवा (उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या) निवडणूक प्रतिनिधीला वरील निर्देशित कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात दि. 9 एप्रिल, 2014 रोजी दुपारी 3-00 वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविण्यासाठी दि. 24 एप्रिल, 2014 रोजी सकाळी 7-00 ते सायंकाळी 6-00 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असे (04) - रावेर  लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी  गुलाबराव खरात यांनी कळविले आहे.

* * * * * * * * *

Thursday, 27 March 2014

निवडणूक कामात हयगय केल्यास कायदेशीर कारवाई करणार : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील


निवडणूक कामात हयगय केल्यास
कायदेशीर कारवाई करणार
                                  : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील

            चाळीसगाव, दिनांक 27 मार्च :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन 2014 च्या पार्श्वभुमीवर विविध कामांचा निपटारा तातडीने होण्याच्या दृष्टीने निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचा-यांनी आपल्यावर सोपविलेल्या कामात हयगय केल्यास लोकप्रतिनिधीत्व कायदा 1950 चे कलम 134 अन्वये कारवाई करण्यात येईल अशा सुचना तहसिल कार्यालयातील आढावा बैठकीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी आढावा बैठकीत केल्या.
            निवडणूक कामकाजात निश्चितच ब-याच अडचणी येतात परंतु येणा-या अडचणींवर मात करुन केवळ सोपविलेली जबाबदारी पार न पाडता देशप्रेमाची भावना मनात ठेवून काम करा तसेच कामकाजात मार्गदर्शन लागल्यास तात्काळ संपर्क करा असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी सदर आढावा बैठकीत केले.
            या बैठकीला तहसिलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, निवासी नायब तहसिलदार व्हि.पी. सुर्यवंशी, पुरवठा निरीक्षक शेख, संदेश निकुंभ, प्रणिल पाटील यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
            लोकसभा सार्वत्रीक निवडणूकीच्या कामकाजाचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश पारित करण्यात आले असून यामध्ये एकूण 21 कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. मुख्य नियंत्रण कक्ष, क्षेत्रिय अधिकारी यांचे सहनियंत्रण कक्ष, आदर्श आचार संहिता कक्ष, टपाल व्यवस्था, हेल्प लाईन मिडीया सेंटर, एक खिडकी कक्ष, वाहन कक्ष, मतदान साहित्य कक्ष, संगणक कक्ष, मतदार यादी कक्ष, मतदान यंत्र सिलींग कक्ष, टपाली मतपत्रीका कक्ष, मतदार ओळखपत्र तपासणी कक्ष, प्रशिक्षण व्यवस्था, मतदार जनजागृती, बॅनर होर्डींग छपाई कक्ष, या प्रकारच्या कक्षांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक कक्षास नेमून दिलेली कामे, कक्ष प्रमुख तसेच सहाय्यक अधिकारी व कर्मचारी अशा विस्तृत स्वरुपातील आदेश पारित करुन या आदेशामध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रातांधिकारी मनोज घोडे यांनी समजावून सांगितली. त्याचप्रमाणे नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी तसेच सर्व अव्वल कारकुन, मंडळ अधिकारी, लिपीक, तलाठी यांनी नेमुन दिलेल्या कामाव्यतिरीक्त इतर आवश्यक ती सर्व कामे देखील सहा.निवडणुक निर्णय अधिकारी यांचे आदेशानुसार पार पाडावयाची आहेत. तसेच सहा.निवडणुक निर्णय अधिका-यांच्या पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये व पुर्व परवानगी शिवाय किरकोळ रजा घेऊ नये अशा सुचना करत सदर अधिकारी, कर्मचा-यांची आढावा बैठक दररोज सायंकाळी 06:00 वाजता तहसिल कार्यालयात घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
                                               * * * * * * * *

Wednesday, 26 March 2014

मतदान म्हणजे एक पवित्र काम समजल्यास मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढणार : निवडणूक निरीक्षक व्ही.पलानी चामी


मतदान म्हणजे एक पवित्र काम समजल्यास
मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढणार
                                  : निवडणूक निरीक्षक व्ही.पलानी चामी

            चाळीसगाव, दिनांक 26 मार्च :-  चाळीसगांव तालुक्यातील विधानसभा मतदार संघात सन 2009 च्या निवडणूकीत सर्वात कमी मतदान झालेल्या एकूण 60 मतदान केंद्रावर लक्ष केंद्रीत करत थेट सदर केंद्रातील बी.एल.ओ. यांच्याशी  चर्चा करुन मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी  बी.एल.ओ. यांनी आपल्या स्तरावरुन आवश्यक त्या उपाययोजना केल्यास मतदानाची टक्केवारी वाढण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे  निवडणूक निरीक्षक व्ही.पलानी चामी यांनी  मार्गदर्शन करतांना सांगितले.
            लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आधारित निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज बी.एल.ओ. तसेच कॅम्पस ॲम्बेसेडर यांच्याशी चर्चा करण्यासाठी निवडणूक निरीक्षकांसमवेत बैठकीचे आयोजन तहसिल कार्यालयात करण्यात आले होते यावेळी  सहा.प्रकल्प अधिकारी ए.व्ही.भोकरे, उप विभागीय अधिकारी मनोज घोडे , तहसिलदार बाबासाहेब गाढवे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, गट विकास अधिकारी मालती जाधव, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, सुर्यवंशी आदि उपस्थित होते.
            कॅम्पस ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केलेल्या महाविद्यालयातील तरुणांशी संवाद साधतांना  मार्गदर्शन करतांना निवडणूक निरीक्षक म्हणाले की, मतदारांमध्ये प्रामुख्याने युवा मतदार व महिला मतदार यांच्यामध्ये मतदानाबाबत उदासिनता दिसून येते तरी युवा मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सोशल मिडीयाचा पुरेपुर वापर करावा व मतदानाच्या दिवशी  मतदारांशी संवाद साधुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मनापासून प्रयत्न करावे. आपले मत हे अमुल्य आहे. आपल्या एका मताने लोकशाही बळकट होण्यासाठी मोठी मदत होणार असल्याची भावना मतदारांच्या मनात रुजवावी व प्रत्येक नागरिकांना मतदान म्हणजे पवित्र काम असे समजावून मतदानासाठी बाहेर पडण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करावे असेही श्री. चामी यांनी यावेळी सांगितले.
            मतदान केंद्र निहाय  आयोजित केलेल्या कॉर्नर सभांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी  मतदानाचे महत्व पटविण्यासाठीच्या उपाय योजना सर्व बी.एल.ओ.ना समजावून सांगितल्या व सर्व बी.एल.ओ. यांनी ही केवळ एक डयुटी न समजता देशप्रेमाची भावना मनात ठेवून काम करावे व मतदानाची टक्केवारी वाढविण्यास मदत करण्याचे आवाहन केले.
            यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी ए.व्हि.भोकरे, प्राताधिकारी मनोज घोडे, तहसलिदार बाबासाहेब गाढवे यांनी मार्गदर्शन केले तर आभार नानासाहेब आगळे यांनी मानले.

                                           * * * * * * * *

Monday, 24 March 2014

निरिक्षकांनी घेतला मतदार जनजागृतीविषयक उपक्रमांचा आढावा


निरिक्षकांनी घेतला मतदार जनजागृतीविषयक उपक्रमांचा आढावा

           जळगाव, दि.24- जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृतीविषयक उपक्रमांचा आढावा मतदार जनजागृती निरिक्षक तथा संचालक वृत्त आकाशवाणी चेन्नाई व्ही पलानीचामी यांनी आज घेतला. मतदार जनजागृतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या  स्विप (SVEEP- Systematic Voters Education & Electoral Participation) मतदाता शिक्षण व सहभागीता कार्यक्रम समितीचा आढावा त्यांनी घेतला.
              जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, अति. जि. प. जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल गायकवाड, , प्रकल्प संचालक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शुक्राचार्य दुधाळ, प्रांताधिकारी अंतुर्लिकर, समाज कल्याण अधिकारी प्रशांत चव्हाण, महिला बाल विकास अधिकारी देवेंद्र राऊत, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) शशिकात हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक शिवाजीराव पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी केंद्र जळगाव विजय सपकाळे , समिती सदस्य विजय पाठक आदी उपस्थित होते.
               जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या  चावडीवर मतदार यादी वाचन, शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांचे संकल्प पत्र भरुन घेणे अशा उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती अग्रवाल यांनी दिली.
              यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. पलानी चामी यांनी आता पर्यंत मतदार नोंदणीसाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर उपक्रमांचे कौतूक करुन आगामी काळात विविध यंत्रणांमार्फत मतदारांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्याच्या सुचना केल्या. त्यासाठी शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या या सारख्या प्रत्यक्ष  जनतेच्या संपर्कात असणा-या यंत्रणेमार्फत संदेश द्यावा, अशा सुचना दिल्या. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मनोहर चौधरी यांनी केले.

* * * * * * * *

Thursday, 20 March 2014

विज पडून मयत झालेल्या ग्रामस्थाच्या पत्नीला मदतीचा धनादेश प्रदान


विज पडून मयत झालेल्या ग्रामस्थाच्या
पत्नीला मदतीचा धनादेश प्रदान

            चाळीसगाव, दिनांक 20 मार्च :-  चाळीसगांव तालुक्यातील मौजे लोनजे येथे दिनांक 09 मार्च, 2014 रोजी  विज पडून कै.दिनेश हरी सोनार हे मयत झाले होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दिड वर्षाचा मुलगा, आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. कै.दिनेश हरी सोनार यांचा विज पडून अकस्मात मृत्यु झाल्याने त्यांची पत्नी श्रीमती वैशाली दिनेश सोनार यांना शासकीय मदत म्हणून उपविभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील तसेच तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांच्या हस्ते  रुपये 1 लाख पन्नास हजार इतक्या रकमेचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी ए.बी.जाधव, तलाठी डि.एन.पाटील व त्यांचे सहकारी अमित दायमा, पोलीस पाटील, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.


* * * * * * * *

Saturday, 15 March 2014

जागृत ग्राहक म्हणजेच जागृत राष्ट्र जागतिक ग्राहकदिनी प्रबोधनात्मक चर्चासत्र संपन्न


जागृत ग्राहक म्हणजेच जागृत राष्ट्र
जागतिक ग्राहकदिनी प्रबोधनात्मक चर्चासत्र संपन्न

            चाळीसगाव, दिनांक 15 मार्च :-  देशाचा प्रत्येक नागरिक हा ग्राहक असतो. ग्राहकांमध्ये जनजागृती होऊन जागृत ग्राहक घडविण्यासाठी तसेच नवीन पिढीला ग्राहकांचे हक्क व अधिकाराची जाणीव होण्यासाठी महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केल्यास ग्राहकांमध्ये ख-या अर्थाने प्रबोधन होईल असे प्रतिपादन नायब तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी जागतीक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात केले.
            या कार्यक्रमासाठी पुरवठा विभागाचे आर.बी.ब्राम्हणे, आय.एस.शेख, संदेश निकुंभ यांच्यासह ग्राहक पंचायत समितीचे सदस्य विकास वाणी, रमेश सोनवणे, रविंद्र जाधव, शाम शिरोडे  तसेच जागृत ग्राहकही मोठया संख्येने उपस्थित होते.
            जागतीक ग्राहक दिनाचे औचित्य साधत आज दिनांक 15 मार्च, 2014 रोजी  जागतिक ग्राहक दिन 2014 तहसिल कार्यालयात सकाळी 10:30 वाजता साजरा करण्यात आला यावेळी ग्राहकांचे प्रबोधन, चर्चासत्र व प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जागतिक ग्राहक दिनानिमीत्ताने ग्राहक प्रबोधनाकरिता वजनमाप, अन्न व भेसळ, गॅस संबंधीचे प्रदर्शन लावण्यात आले होते.  ग्राहक प्रबोधनामध्ये ग्राहकांचे हक्क, ग्राहकाने खरेदी करतांना घ्यावयाची काळजी, ग्राहक संरक्षण कायदा, तक्रार कोण करु शकतो, तक्रार कोठे दाखल करावी, अपील कसे दाखल करावे या बाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होऊन जागृत ग्राहक निर्मीतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
            या कार्यक्रमात ग्राहक पंचायत समिती सदस्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार हे पुरवठा विभागातील संदेश निकुंभ यांनी  मानले.


* * * * * * * *

Friday, 14 March 2014

गारपीटीने अवकाळी पावसात मयत शेतक-याच्या वारसांना मदतीचा धनादेश प्रदान : प्रांताधिकारी गणेश मिसाळ


गारपीटीने अवकाळी पावसात मयत शेतक-याच्या
वारसांना मदतीचा धनादेश प्रदान
: प्रांताधिकारी गणेश मिसाळ

            चाळीसगाव/पाचोरा, दिनांक 14 मार्च :-  पाचोरा तालुक्यातील मौजे कु-हाड खु. येथील शेतकरी कै.अर्जुन सुकदेव पाटील हे दिनांक 08.03.2014 रोजीच्या गारपीटीने झालेल्या अवकाळी पावसात मयत झाले होते. तरी  कै.अर्जुन सुकदेव पाटील यांचे वारस त्यांच्या पत्नी श्रीमती बेबाबाई अर्जुन पाटील यांना शासनामार्फत नैसर्गिक आपत्तीतून मदत म्हणून रु.1,50,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख पन्नास हजार) इतक्या रकमेचा धनादेश आज पाचोरा प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला यावेळी पाचोरा तहसिलदार गणेश मरकड, निवासी नायब तहसिलदार आबा महाजन, नायब तहसिलदार राजेंद्र नजन, कु-हाड गावचे तलाठी ए.यु.ठाकरे आदी उपस्थित होते.
कै.अर्जुन सुकदेव पाटील यांच्या वारसांना तहसिलदार, पाचोरा यांच्या दिनांक 10.03.2014 च्या आदेशानुसार सदर रक्कम त्यांना अदा करण्यात आली या व्यतिरीक्त आम आदमी विमा योजनेचा रु. 75000/- इतक्या रकमेचा तसेच शेतकरी अपघात विमा योजनेचा रु.1 लाखाचा प्रस्ताव हा सर्व कागदपत्रांसह मंजूरीसाठी पाठविण्यात आला असून लवकरच त्यांना विमा योजनेच्या लाभाची रक्कमही प्रदान करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी मिसाळ यांनी कळविले आहे


* * * * * * * *

Thursday, 13 March 2014

चाळीसगाव येथे जागतिक ग्राहकदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन : तहसिलदार बाबासाहेब गाढवे

चाळीसगाव येथे जागतिक ग्राहकदिनाच्या
कार्यक्रमाचे आयोजन
: तहसिलदार बाबासाहेब गाढवे

            चाळीसगाव, दिनांक 14 मार्च :-  ग्राहक अन्यायाविरुध्द उपाय योजना करतांना जागृत ग्राहक, संघटीत ग्राहक शक्ती, ग्राहक कायद्याचे ज्ञान व  त्याअनुषंगाने समाज समर्पित जागृत ग्राहक निर्मीतीसाठी जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधत  दिनांक 15 मार्च, 2014 रोजी  जागतिक ग्राहक दिन 2014 साजरा करण्यात येत आहे. तहसिल कार्यालयात सकाळी 10:30 वाजता ग्राहकांचे प्रबोधन, चर्चासत्र व प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या जागतिक ग्राहक दिनानिमीत्ताने ग्राहक प्रबोधनाकरिता वजनमाप, अन्न व भेसळ, गॅस संबंधीचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे.  ग्राहक प्रबोधनामध्ये ग्राहकांचे हक्क, ग्राहकाने खरेदी करतांना घ्यावयाची काळजी, ग्राहक संरक्षण कायदा, तक्रार कोण करु शकतो, तक्रार कोठे दाखल करावी, अपील कसे दाखल करावे या बाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होऊन जागृत ग्राहक निर्मीतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी, ग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * * *

Wednesday, 12 March 2014

पाणी अर्ज सादर करण्यासाठी 31 मार्च पर्यत मुदतवाढ

पाणी अर्ज सादर करण्यासाठी 31  मार्च  पर्यत मुदतवाढ

           जळगाव, दि. 12-  गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव अंतर्गत गिरणा प्रकल्पावरील मन्याड, बोरी , भोकरबारी, अंजनी मध्यम प्रकल्पावरुन कालवा प्रवाही, कालवा उपसा, जलाशय उपसा, लाभक्षेत्रातील अधिसूचित नदी, नाले, ओढे यावरुन उपसा सिंचनाने तसेच  लाभक्षेत्रातील व 35 मीटर आतील विहिरीवरुन पाण्याचा लाभ घेणा-या  लाभार्थ्यासाठी प्रकल्पावरील मन्याड, बोरी , भोकरबारी, अंजनी मध्यम प्रकल्पात सिंचनासाठी उपलब्ध असलेल्या पाणी साठयातून रब्बी हंगामातील उन्हाळी हंगामात उभी पीके  (बाजरी, मका, गहू, हरबरा, भाजीपाला इ.) तसेच  उन्हाळी  हंगामातील बाजरी , मका, भाजीपाला इ. हंगामी पिकांना उन्हाळी हंगाम 2013 -14 मध्ये 1 आवर्तन किंवा पाण्याचे उपलब्धतेनुसार पाणी पुरवठा करण्यात येईल.
            तसेच हातगांव - 1, पिंप्री उंबरहोळ, ब्राम्हणशेवगा ता चाळीसगाव या लघु प्रकल्‍पावरुन कालवा प्रवाही, कालवा उपसा, जलाशय नदी- नाल्यावरुन उपसा, लाभक्षेत्रातील व 35 मी. आतील विहिरी वरुन तसेच वाघळा- 1, वाघळा -2, पिंपरखेड, कुंझर-2, देवळीभोरस, कृष्णापुरी व बोरखेडा ता. चाळीसगाव, पथराड ता. भडगाव, मन्यारखेडा, विटनेर, ता . जळगाव, पदमालय, खडकेसिम ता एरंडोल या लघु तलावावरुन फक्त जलाशय उपसा सिंचनासाठी उन्हाळी हंगाम 2013 - 14 मध्ये 1 आवर्तन किंवा पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी पुरवठा करण्यात येईल.
           त्यासाठी  अटींच्या पुर्ततेसह नमुना नं. 7, 7 अ, व 7 ब चे पाणी अर्जावर मागणी करुन पाणी अर्ज दिनांक 31 मार्च 2014 च्या आत  संबंधीत पाटशाखा कार्यालयात कार्यालयीन वेळेत  अगर पोष्टाने देण्याचे करावे           सिंचनाच्या पाणी पुरवठयासाठीच्या अटी व शर्ती  नियमानुसार राहतील असे कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

* * * * * * * *

Tuesday, 11 March 2014

चोपडा व यावल येथे माजी सैनिक तालुका समिती बैठक

चोपडा व यावल येथे माजी सैनिक तालुका समिती बैठक

           जळगाव, दि. 11 :- माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबितांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी गठीत केलेल्या समितीची बैठक चोपडा व यावल येथे अनुक्रमे  दि. 19 व 26 रोजी सकाळी साडे अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. संबंधित तालुक्यातील माजी सैनिक, विधवा व अवलंबितांनी आपल्या अडचणी लेखी स्वरुपात दोन प्रतीत आणव्यात व बैठकीस उपस्थित राहून आपले प्रकरण सादर करावे. असे आवाहन कमांडर (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलींदकुमार एम. बडगे यांनी केले आहे.

                                                                            * * * * * * * * 

Friday, 7 March 2014

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची संधी : प्रांताधिकारी मनोज घोडे


निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार
 मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची संधी
: प्रांताधिकारी मनोज घोडे

            चाळीसगाव, दिनांक 07 मार्च :-  भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे नुकतीच मतदारयादी पुर्ननिरीक्षण मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात 1 जानेवारी, 2014 या अर्हता दिनांकावर आधारित एकुण मतदार  3,10,094 एवढे असुन त्यामध्ये पुरुष मतदार  1,66,707 तर 1,43,387 इतक्या महिला मतदार आहेत. मतदारयादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रम 2013 मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून जे मतदार कायम स्थलांतरीत झालेले होते अथवा मयत झालेले होते त्यांची वगळणी करण्यात आलेली होती. तथापी वगळणी केलेले मतदार हे जर वगळणी नंतर पुन्हा चाळीसगाव मतदारसंघात सर्वसाधारण रहिवासासाठी आलेले असतील तर त्यांनी आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे जर आपले नाव मतदार यादीत नसल्यास ते समाविष्ट करण्यासाठी रविवार दिनांक 09 मार्च, 2014 रोजी  फॉर्म नमुना नं.6 हा भरुन आपल्या स्थानिक केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बी.एल.ओ. यांचेकडे जमा करावे तसेच ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे परंतु छायाचित्र नाही अशा मतदारांनी आपले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यामागे आपले संपुर्ण नाव, पत्ता व यादी भाग क्रमांक नमुद करुन संबंधित बी.एल.ओ. यांचेकडे जमा करण्याचे आवाहन प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.
            निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदाराचे वय दिनांक 01.01.2014 या अर्हता दिनांकास 18 वर्षे पुर्ण झालेले आहे अशा नवमतदारांनी देखील नमुना नं.6 हा फॉर्म भरून आपला मतदानाचा हक्क प्राप्त करून मतदारयादी अद्यावत करणेकामी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.


* * * * * * * *

आदर्श आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा : प्राताधिकारी गणेश मिसाळ


आदर्श आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा !
                                                               : प्राताधिकारी गणेश मिसाळ

            चाळीसगाव/पाचोरा, दिनांक 07 मार्च :- भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे लोकसभा निवडणूक 2014 ची आचार संहिता सर्वत्र लागू झाल्याने उप विभागीय अधिकारी  पाचोरा गणेश मिसाळ यांनी  पाचोरा विधानसभा मतदार संघात येणा-या सर्व पोलीस पाटील, ग्रामसेवक, व स्थानिक केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बी.एल.ओ. यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज बैठकीचे आयोजन केले होते.  या बैठकीत मार्गदर्शन करतांना आदर्श आचार संहितेबाबत भारत निवडणूक आयोगाच्या दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेंसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1995 व भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देशांची  माहिती देऊन या निर्देशानुसार सार्वजानिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहीणे, निवडणूक चिन्ह लिहीणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित करणेवर बंदी घातलेली आहे अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी  सार्वजानिक मालमत्ता विद्रुपित केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, भित्ती पत्रके, घोषणा, झेंडे, कापडी फलक, व चिन्ह इ.काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी अन्यथा  उपरोक्त नियमानुसार सार्वजानिक मालमत्ता विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यत दंड अथवा दोन्ही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील याची नोंद घ्यावी. असे प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
            त्याच बरोबर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आचार संहिता लागल्यानंतर पहिल्या रविवारी म्हणजेच  दिनांक 09 मार्च, 2014 रोजी मतदारांना आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मतदार संघातील ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ठ नाहीत ती नावे मतदार यादीत समाविष्ठ करण्यासाठी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन फॉर्म नमुना न.6 भरुन संबंधित बी.एल.ओ.कडे सादर करावा , अशा उमेदवारांची पुरवणी यादी तयार करण्यात येऊन लोकसभा निवडणूक-2014 मध्ये त्यांना मतदान करण्याचा हक्क प्राप्त होणार आहे. तरी या संधीचा मतदार संघातील जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घ्यावा असे आवाहनही प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी केले आहे. तसेच ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे परंतु छायाचित्र नाही अशा मतदारांनी आपले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यामागे आपले संपुर्ण नाव, पत्ता व यादी भाग क्रमांक नमुद करुन संबंधित बी.एल.ओ. यांचेकडे जमा करण्याचे आवाहन प्रांताधिकारी गणेश मिसाळ  यांनी केले आहे.

                                           * * * * * * * *

Thursday, 6 March 2014

निवडणूक आचार संहितेबाबत अधिका-यांना मार्गदर्शन



निवडणूक आचार संहितेबाबत अधिका-यांना मार्गदर्शन

जळगाव, दि.6 -  भारत निवडणूक आयोग दिल्ली यांनी दि. 5 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणूकीची घोषणा केली आणि निवडणूक आदर्श आचारसंहितेस प्रारंभ झाला. या पार्श्वभूमिवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून जळगाव जिल्ह्यात आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांची सभा आज बोलावण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अल्पबचत सभागृहात ही सभा पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुबल अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आदर्श आचार संहिता काळात अधिकारी कर्मचा-यांनी कटाक्षाने पाळावयाच्या बाबींची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. तसेच निवडणूक यंत्रणेत सहभागी असलेल्या अधिकारी कर्मचा-यांनीही आपला मतदानाचा हक्क बजवावा, त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी, सार्वजनिक जागी लावलेले शासकीय योजनांचे जाहिरात फलकावरील मजकूर हटविण्यात यावा, तसे अहवाल निवडणुक शाखेला सादर करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक एस. जयकुमार यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थे संदर्भात सद्यस्थितीची माहीती दिली. निवडणूक प्रक्रिया ही प्रशासनातील सा-यांची सामूहिक जबाबदारी असून ती पार पाडण्यासाठी सा-यांनी कटीबद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या सभेस जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले, अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनपा आयुक्त संजय कापडणीस आदी वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी यांनी केले.


* * * * * * * *

Tuesday, 4 March 2014

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2013 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


                  राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2013 साठी
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

           जळगाव दि. 4 : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. 2013 या वर्षाकरिता दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2013 पर्यंतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 मार्च 2014 असा राहील. 2013 या कॅलेंडर वर्षात प्रसिद्ध झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या संदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात येईल. स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छूकांनी मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, 17 वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळांवरही उपलब्ध आहेत. पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे.
               राज्यस्तर (मराठी) आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (इंग्रजी) अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (हिंदी) बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, राज्यस्तर (उर्दू) मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; शासकीय गट (मराठी) यशवंतराव चव्हाण पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार-मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व 41 हजार रुपये आणि केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा. व ज.) 41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.

                                                            विभागीय पुरस्कार
नाशिक विभाग : दादासाहेब पोतनीस पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
औरंगाबाद विभाग (लातूरसह) : अनंतराव भालेराव पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;
मुंबई विभाग: आचार्य अत्रे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;
पुणे विभाग : नानासाहेब परुळेकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;
कोकण विभाग: शि.म.परांजपे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;
कोल्हापूर विभाग : ग.गो.जाधव पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;
अमरावती विभाग : लोकनायक बापूजी अणे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;
नागपूर विभाग: ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.

                                                नियम व अटी
            पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचाही विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/ विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीय स्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमतीपत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
                पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास, ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला प्रवेशिकेबरोबर जोडलेला असावा. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.पत्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदारांनी राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्य पातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील. ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल. जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई (कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असले तरी ते ग्राह्य मानण्यात येतील. गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनाही आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात पाठविता येतील.
             शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधित विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील. 2013 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेशिका राज्यस्तरासाठी किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे, याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. प्रत्येक गटासाठी व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास, त्याचा विचार केला जाणार नाही.
 
इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा

           इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील पत्रकारांसाठी उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खासगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल.
           पुरस्काराचे स्वरुप 41,000 रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/ संपादक यांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
          प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/ कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक/ जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडे तर मुंबईकरिता मा.महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, 17 वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई-32 यांचेकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तकथाचित्र राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती करण्यात येईल. तसेच याशिवाय अटी नियम पुस्तिकेतील क्रमांक 6 आणि अन्य संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.

छायाचित्रकार पुरस्कार
राज्यस्तर : तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार 41 हजार रुपये, उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे.
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज) 41 हजार रुपये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राकरिता आहे.
           2013 च्या पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2013 या कालावधीत प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य मानण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी.
          पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी जनतेमधील जाणिव जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल.
         एकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिद्ध झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
           या स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जांचे नमुने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या http://dgipr.maharashtra.gov.in तसेच महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, संचालक, नागपूर-अमरावती व संचालक, औरंगाबाद, महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी-गोवा तसेच नवी दिल्ली आणि मा. महासंचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, 17 वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई-32 येथे उपलब्ध आहेत.
           या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

* * * * * * * *

Monday, 3 March 2014

महिला लैंगिक छळ प्रतिबंध कायद्यातंर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न


महिला लैंगिक छळ  प्रतिबंध कायद्यातंर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

जळगाव, दि. 3 :- जळगाव जिल्हयातील कार्यालयातील समिती सदस्याचे तीन दिवसीय प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधीनी, पुणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतेच संपन्न झाले. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ प्रतिबंध कायदा 2013 केंद्र शासनाने पारित केलेला आहे. कामाच्या ठिकाणी शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय महामंडळे, कंपन्या, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यालये, शासन अनुदानित मंडळे व संस्था, उद्योग, इस्पीतळे, शैक्षणिक संस्था इत्यादी  ठिकाणी तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक केले आहे. सदर समितीच्या अध्यक्षपदी महिला असणे व समितीमध्ये एकूण समिती सदस्यांपैकी 50 टक्के महिला असणे आवश्यक आहे. तसेच लैगिक छळ या विषयावर बांधीलकी असलेल्या संस्था किंवा व्यक्ती अशासकीय सदस्य म्हणून असणे गरजेचे आहे. याबाबत पुणे  यशदाचे समन्वयक श्री. पियुष गडे, ॲड. अभया शेलकर, नाशिक येथील श्रीमती निलिमा साठे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , देवेद्र राऊत यांनी मार्गदर्शन केले.
           सदर प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी प्रदीप ससाणे, संजय चव्हाण व पी. व्ही. पाटील यांनी परिश्रम घेतले.


* * * * * * *

मतदारांना मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची संधी : प्रांताधिकारी गणेश मिसाळ

मतदारांना मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची संधी
: प्रांताधिकारी गणेश मिसाळ

            चाळीसगाव, दिनांक 03 मार्च :-  भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे नुकतीच मतदारयादी पुर्ननिरीक्षण मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. 18 पाचोरा विधानसभा मतदारसंघातंर्गत 1 जानेवारी, 2014 या अर्हता दिनांकावर आधारित एकुण मतदार 2,73,591 एवढे असुन त्यामध्ये पुरुष मतदार 1,45,030 तर 1,28,305 इतक्या महिला मतदार आहेत. मतदारयादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रम 2013 मध्ये पाचोरा विधानसभा मतदार संघातून जे मतदार कायम स्थलांतरीत झालेले होते तसेच मयत झालेले होते त्यांची वगळणी करण्यात आलेली होती. वगळणीयादी नुसार वगळणी मतदारांची संख्या 17,200 इतकी आहे.  तथापी वगळणी केलेले मतदार हे जर वगळणी नंतर पुन्हा पाचोरा मतदारसंघात सर्वसाधारण रहिवासासाठी आलेले असतील तर त्यांनी आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे जर आपले नाव मतदार यादीत नसल्यास ते समाविष्ट करण्यासाठी फॉर्म नमुना नं.6 हा भरुन आपल्या स्थानिक केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बी.एल.ओ. यांचेकडे अथवा निवडणूक शाखा, तहसिल कार्यालय, पाचोरा व भडगांव यांचेकडे जमा करण्याचे आवाहन प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी केले आहे.
            निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदाराचे वय दिनांक 01.01.2014 या अर्हता दिनांकास 18 वर्षे पुर्ण झालेले आहे अशा नवमतदारांनी देखील नमुना नं.6 हा फॉर्म भरून मतदारयादी अद्यावत करणेकामी प्रशासनाच्या मतदार पुर्ननिरीक्षण मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहनही गणेश मिसाळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * * *

Saturday, 1 March 2014

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या पुर्व तयारीसाठी बी.एल.ओ.चे प्रशिक्षण शिबीर संपन्न

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या
पुर्व तयारीसाठी बी.एल.ओ.चे प्रशिक्षण शिबीर संपन्न

            चाळीसगाव, दिनांक 01 मार्च :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 च्या पुर्वतयारीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (B.L.O.) यांच्या साठी एकदिवसीय शिबीराचे आयोजन येथील हंस चित्रपट गृहात तालुका प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबीरास मतदार नोंदणी अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी उपस्थित असलेल्या बी.एल.ओ. यांना मार्गदर्शक सुचना दिल्या, यावेळी  सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसिलदार निवडणूक सुर्यवंशी यांच्यासह कर्मचारी व केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मोठया संख्येने उपस्थित होते.
            भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 ची घोषणा केल्यानंतर म्हणजेच आचार संहिता लागू झाल्यानंतर पहिल्या रविवारी सर्व बी.एल.ओ. यांनी आपल्या भागाच्या यादीसह मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देऊन मतदान केंद्रावर मतदार यादी भागाचे व वगळणीयादीचे वाचन करणे आणि नव्याने मतदार यादीत नाव नोंदणीकामी फॉर्म नमुना नं.6, दुरुस्तीसाठी फॉर्म नमुना नं.8, स्थलांतरासाठी फॉर्म नमुना नं. 8-अ इत्यादी फॉर्म  अचुक असल्याची खातरजमा करुन स्विकारण्याच्या सुचना दिल्या.
            या प्रशिक्षण शिबीरात केंद्रस्तरीय अधिका-यांना मार्गदर्शन केल्यानंतर संपुर्ण माहितीचे प्रोजेक्टरच्या माध्यमाने स्लाईड शो दाखविण्यात आला. व त्यानंतर बी.एल.ओ. यांच्याशी प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी सुसंवाद साधून कामात येणा-या अडचणी समजावून घेतल्या. बी.एल.ओ. यांना सदर कामकाजाकरिता मिळत असलेले मानधन कमी असल्यामुळे ते वाढवून मिळावे अशी विनंती बी.एल.ओ.नी केली तर तशा मागणीचे निवेदन सादर करण्याच्या सुचनाही प्रांताधिका-यांनी  संबंधितांना यावेळी  दिल्या.


* * * * * * * *