Saturday, 15 March 2014

जागृत ग्राहक म्हणजेच जागृत राष्ट्र जागतिक ग्राहकदिनी प्रबोधनात्मक चर्चासत्र संपन्न


जागृत ग्राहक म्हणजेच जागृत राष्ट्र
जागतिक ग्राहकदिनी प्रबोधनात्मक चर्चासत्र संपन्न

            चाळीसगाव, दिनांक 15 मार्च :-  देशाचा प्रत्येक नागरिक हा ग्राहक असतो. ग्राहकांमध्ये जनजागृती होऊन जागृत ग्राहक घडविण्यासाठी तसेच नवीन पिढीला ग्राहकांचे हक्क व अधिकाराची जाणीव होण्यासाठी महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केल्यास ग्राहकांमध्ये ख-या अर्थाने प्रबोधन होईल असे प्रतिपादन नायब तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी जागतीक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात केले.
            या कार्यक्रमासाठी पुरवठा विभागाचे आर.बी.ब्राम्हणे, आय.एस.शेख, संदेश निकुंभ यांच्यासह ग्राहक पंचायत समितीचे सदस्य विकास वाणी, रमेश सोनवणे, रविंद्र जाधव, शाम शिरोडे  तसेच जागृत ग्राहकही मोठया संख्येने उपस्थित होते.
            जागतीक ग्राहक दिनाचे औचित्य साधत आज दिनांक 15 मार्च, 2014 रोजी  जागतिक ग्राहक दिन 2014 तहसिल कार्यालयात सकाळी 10:30 वाजता साजरा करण्यात आला यावेळी ग्राहकांचे प्रबोधन, चर्चासत्र व प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जागतिक ग्राहक दिनानिमीत्ताने ग्राहक प्रबोधनाकरिता वजनमाप, अन्न व भेसळ, गॅस संबंधीचे प्रदर्शन लावण्यात आले होते.  ग्राहक प्रबोधनामध्ये ग्राहकांचे हक्क, ग्राहकाने खरेदी करतांना घ्यावयाची काळजी, ग्राहक संरक्षण कायदा, तक्रार कोण करु शकतो, तक्रार कोठे दाखल करावी, अपील कसे दाखल करावे या बाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होऊन जागृत ग्राहक निर्मीतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
            या कार्यक्रमात ग्राहक पंचायत समिती सदस्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार हे पुरवठा विभागातील संदेश निकुंभ यांनी  मानले.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment