मतदारांना
मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची संधी
: प्रांताधिकारी गणेश मिसाळ
चाळीसगाव, दिनांक 03 मार्च :-
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे
नुकतीच मतदारयादी पुर्ननिरीक्षण मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. 18 पाचोरा विधानसभा
मतदारसंघातंर्गत 1 जानेवारी, 2014 या अर्हता दिनांकावर आधारित एकुण मतदार 2,73,591
एवढे असुन त्यामध्ये पुरुष मतदार 1,45,030 तर 1,28,305 इतक्या महिला मतदार आहेत.
मतदारयादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रम 2013 मध्ये पाचोरा विधानसभा मतदार संघातून जे मतदार
कायम स्थलांतरीत झालेले होते तसेच मयत झालेले होते त्यांची वगळणी करण्यात आलेली
होती. वगळणीयादी नुसार वगळणी मतदारांची संख्या 17,200 इतकी आहे. तथापी वगळणी केलेले मतदार हे जर वगळणी नंतर
पुन्हा पाचोरा मतदारसंघात सर्वसाधारण रहिवासासाठी आलेले असतील तर त्यांनी आपले नाव
मतदार यादीत तपासून घ्यावे जर आपले नाव मतदार यादीत नसल्यास ते समाविष्ट
करण्यासाठी फॉर्म नमुना नं.6 हा भरुन आपल्या स्थानिक केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच
बी.एल.ओ. यांचेकडे अथवा निवडणूक शाखा, तहसिल कार्यालय, पाचोरा व भडगांव यांचेकडे
जमा करण्याचे आवाहन प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदाराचे
वय दिनांक 01.01.2014 या अर्हता दिनांकास 18 वर्षे पुर्ण झालेले आहे अशा नवमतदारांनी
देखील नमुना नं.6 हा फॉर्म भरून मतदारयादी अद्यावत करणेकामी प्रशासनाच्या मतदार
पुर्ननिरीक्षण मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहनही गणेश मिसाळ यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment