Monday, 3 March 2014

महिला लैंगिक छळ प्रतिबंध कायद्यातंर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न


महिला लैंगिक छळ  प्रतिबंध कायद्यातंर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

जळगाव, दि. 3 :- जळगाव जिल्हयातील कार्यालयातील समिती सदस्याचे तीन दिवसीय प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधीनी, पुणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतेच संपन्न झाले. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ प्रतिबंध कायदा 2013 केंद्र शासनाने पारित केलेला आहे. कामाच्या ठिकाणी शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय महामंडळे, कंपन्या, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यालये, शासन अनुदानित मंडळे व संस्था, उद्योग, इस्पीतळे, शैक्षणिक संस्था इत्यादी  ठिकाणी तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक केले आहे. सदर समितीच्या अध्यक्षपदी महिला असणे व समितीमध्ये एकूण समिती सदस्यांपैकी 50 टक्के महिला असणे आवश्यक आहे. तसेच लैगिक छळ या विषयावर बांधीलकी असलेल्या संस्था किंवा व्यक्ती अशासकीय सदस्य म्हणून असणे गरजेचे आहे. याबाबत पुणे  यशदाचे समन्वयक श्री. पियुष गडे, ॲड. अभया शेलकर, नाशिक येथील श्रीमती निलिमा साठे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , देवेद्र राऊत यांनी मार्गदर्शन केले.
           सदर प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी प्रदीप ससाणे, संजय चव्हाण व पी. व्ही. पाटील यांनी परिश्रम घेतले.


* * * * * * *

No comments:

Post a Comment