उमेदवाराने
निवडणूक खर्चविषयक
स्वतंत्र
व योग्य लेखे ठेवणे आवश्यक !
: सहा.खर्च
निरीक्षक ईश्वर घोडे
चाळीसगाव, दिनांक 29
मार्च
:- लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 77 (1) नुसार नामनिर्देशनापासून ते
निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या कालावधीसाठी प्रत्येक उमेदवाराने निवडणूक
खर्चविषयक स्वतंत्र व योग्य लेखे ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सहाय्यक खर्च
निरीक्षक ईश्वर घोडे यांनी तहसिल कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत केले. लोकसभा
सार्वत्रिक निवडणुक सन 2014 च्या पार्श्वभुमीवर सहाय्यक निवडणूक निर्णय
अधिका-यांनी स्थापन केलेले फिरते भरारी पथक, खर्च संनियंत्रण कक्ष, स्थिर
सर्व्हेक्षण पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक, व्हिडीओ पहाणी पथक, लेखा पथक, आदर्श
आचारसंहिता कक्ष यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचा-यांची आढावा बैठक आज
तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.
या
बैठकीला सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे, तहसिलदार बाबासाहेब
गाढवे, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, निवासी नायब तहसिलदार व्हि.पी.सुर्यवंशी आदि
उपस्थित होते.
लोकसभा
निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेच्या उल्लघनाबाबत तक्रार करण्यासाठी तहसिल
कार्यालयात स्वतंत्र आदर्श आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली असून नानासाहेब
आगळे हे कक्ष प्रमुख आहेत तसेच येथे संपर्क करण्यासाठी 02589-224022 हा क्रमांक
असुन नागरिकांना आचार संहितेबाबत काही तक्रारी असल्यास या कक्षाशी संपर्क
साधण्याचे आवाहन प्रातांधिकारी मनोज घोडे यांनी यावेळी केले आहे. तसेच या कक्षात
स्वतंत्र एक खिडकी कक्ष असुन प्रचार सभांसाठी परवानगी, प्रचारासाठी वाहन परवाना,
सभा बैठकांना परवानगी घेणे या प्रकारचे कामकाज होणार असल्याचेही त्यांनी यावेळी
सांगितले.
वरील
सर्व पथक व कक्षामध्ये नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचा-यांनी दैनंदिन अहवाल लेखा पथकाकडे तर लेखा पथकाने
जिल्हास्तरीय लेखाकन पथकाकडे सहाय्यक खर्च निरीक्षकांमार्फत निर्धारीत वेळेवर सादर
करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात
* * * * * * * *
No comments:
Post a Comment