Wednesday, 12 March 2014

पाणी अर्ज सादर करण्यासाठी 31 मार्च पर्यत मुदतवाढ

पाणी अर्ज सादर करण्यासाठी 31  मार्च  पर्यत मुदतवाढ

           जळगाव, दि. 12-  गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव अंतर्गत गिरणा प्रकल्पावरील मन्याड, बोरी , भोकरबारी, अंजनी मध्यम प्रकल्पावरुन कालवा प्रवाही, कालवा उपसा, जलाशय उपसा, लाभक्षेत्रातील अधिसूचित नदी, नाले, ओढे यावरुन उपसा सिंचनाने तसेच  लाभक्षेत्रातील व 35 मीटर आतील विहिरीवरुन पाण्याचा लाभ घेणा-या  लाभार्थ्यासाठी प्रकल्पावरील मन्याड, बोरी , भोकरबारी, अंजनी मध्यम प्रकल्पात सिंचनासाठी उपलब्ध असलेल्या पाणी साठयातून रब्बी हंगामातील उन्हाळी हंगामात उभी पीके  (बाजरी, मका, गहू, हरबरा, भाजीपाला इ.) तसेच  उन्हाळी  हंगामातील बाजरी , मका, भाजीपाला इ. हंगामी पिकांना उन्हाळी हंगाम 2013 -14 मध्ये 1 आवर्तन किंवा पाण्याचे उपलब्धतेनुसार पाणी पुरवठा करण्यात येईल.
            तसेच हातगांव - 1, पिंप्री उंबरहोळ, ब्राम्हणशेवगा ता चाळीसगाव या लघु प्रकल्‍पावरुन कालवा प्रवाही, कालवा उपसा, जलाशय नदी- नाल्यावरुन उपसा, लाभक्षेत्रातील व 35 मी. आतील विहिरी वरुन तसेच वाघळा- 1, वाघळा -2, पिंपरखेड, कुंझर-2, देवळीभोरस, कृष्णापुरी व बोरखेडा ता. चाळीसगाव, पथराड ता. भडगाव, मन्यारखेडा, विटनेर, ता . जळगाव, पदमालय, खडकेसिम ता एरंडोल या लघु तलावावरुन फक्त जलाशय उपसा सिंचनासाठी उन्हाळी हंगाम 2013 - 14 मध्ये 1 आवर्तन किंवा पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी पुरवठा करण्यात येईल.
           त्यासाठी  अटींच्या पुर्ततेसह नमुना नं. 7, 7 अ, व 7 ब चे पाणी अर्जावर मागणी करुन पाणी अर्ज दिनांक 31 मार्च 2014 च्या आत  संबंधीत पाटशाखा कार्यालयात कार्यालयीन वेळेत  अगर पोष्टाने देण्याचे करावे           सिंचनाच्या पाणी पुरवठयासाठीच्या अटी व शर्ती  नियमानुसार राहतील असे कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment