जळगाव दि. 29(जिमाका) :- महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-2025 या परीक्षेचे आयोजन 27 मे ते 30 मे 2025 आणि 2 जून ते 5 जून 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. ही परीक्षा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांमध्ये "पवित्र" प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे.
दरम्यान, उर्दू माध्यमातील एकूण 1107 उमेदवारांची डी.एल.एड द्वितीय वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षा आणि TAIT-2025 परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने, संबंधित उमेदवारांची TAIT परीक्षा 3 जून 2025 ऐवजी 30 मे 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
तरी विद्यार्थी उमेदवारांनी या बदलाची नोंद घेऊन परीक्षेस दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे. त्यानुसार झालेल्या बदलाप्रमाणे स्वतःची माहिती तपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेऊन परीक्षेस उपस्थित व्हावे याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराबर राहिल याची नोंद घेण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment