Thursday, 29 May 2025

चाळीसगाव MIDC उत्तर महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायाच्या केंद्रस्थानी येणार...


 चाळीसगाव MIDC उत्तर महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायाच्या केंद्रस्थानी येणार...

मुंबई येथे उद्योगमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत D+ झोनच्या मंजुरीचा ऐतिहासिक निर्णय..!

राज्याचे उद्योग मंत्री ना.श्री.उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री ना.श्री.गुलाबरावजी पाटील, वस्रोद्योग मंत्री ना.श्री.संजयजी सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार, सबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील प्रमुख MIDC पैकी एक असणाऱ्या चाळीसगाव तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या मुद्द्यांकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.
चाळीसगाव तालुका सध्या D+ झोनमध्ये समाविष्ट नसल्याने जागा उपलब्ध असूनही गेल्या ५ वर्षात एकही मोठा उद्योग तेथे येऊ शकला नाही, त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध औद्योगिक सवलती, अनुदाने व प्रोत्साहन योजना लागू होत नाहीत. त्यामुळे स्थानिक उद्योजक व युवकांना उद्योग उभारणीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सद्यस्थितीत चाळीसगाव MIDC मध्ये भारत वायररोप, गुजरात अंबुजा व बिरला प्रीझिशन आदी प्रमुख कंपन्या यशस्वीपणे सुरु आहेत, चाळीसगावची भौगोलिक परिस्थिती पाहता रेल्वे व महामार्गाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे कनेक्टीव्हिटी हि नवीन उद्योगांसाठी अनुकूल आहे. उद्योग विभागाचे झोन निर्धारण निकष - सामाजिक मागासलेपण, बेरोजगारीचा दर, प्रति व्यक्ती उत्पन्न, स्थलांतर दर, औद्योगिक वाणिज्य स्थिती- हे सर्व निकष बघता जळगाव औद्योगिक क्षेत्रात विशेषतः चाळीसगाव औद्योगिक क्षेत्राचे D+ Zone मध्ये समाविष्ट करणे क्रमप्राप्त ठरते अशीमागणी मी यावेळी केली.
माझ्या मागणीला मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत चाळीसगाव तालुक्याचा D+ झोन मध्ये समावेश करण्याचा तत्काळ निर्णय घेतला त्याबद्दल उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांचे मनापासून आभार. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार तसेच नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळात चाळीसगाव MIDC उत्तर महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्राच्या केंद्रस्थानी येऊन तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा मला विश्वास आहे.

No comments:

Post a Comment