नवयुगाचा नवा निर्धार – कायदा, संधी आणि समृद्धीकडे वाटचाल"
शस्त्र परवाना प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी
जळगाव : श्री. आयुष प्रसाद यांनी आज महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील उमर्टी गावास भेट देऊन स्थानिक युवक व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान, त्यांनी नम्रपणे स्पष्ट केले की काहीवेळा गुन्हेगारी प्रकरणांत या परिसराचा उल्लेख होतो, मात्र ते आपल्यालाही योग्य वाटत नाही आणि आम्हालाही ते समाधानकारक वाटत नाही. हा उल्लेख परिसराच्या प्रतिमेपेक्षा अधिक गृहितकांवर आधारित असू शकतो.
आजच्या तंत्रज्ञान, नवोन्मेष व उद्योजकतेच्या युगात ग्रामीण भागातील युवकांसमोर अनेक सकारात्मक संधी उपलब्ध आहेत — शेती, उद्योग, व्यवसाय, डिजिटल सेवा, नोकरी, स्वयंरोजगार अशा अनेक क्षेत्रांत भविष्य घडवता येते. जिल्हा प्रशासन त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य देण्यास सदैव तत्पर आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले की, युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन द्यावे, त्यांच्या स्वप्नांना दिशा द्यावी आणि त्यांना कायदेशीर व सकारात्मक वाटेवर प्रोत्साहित करावे. कोणताही गैरप्रकार अथवा अनधिकृत कृती परिसरात घडल्यास, ते पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास तत्काळ आणून द्यावेत.
या संवादातून सीमावर्ती भागातील नागरिकांचा सहभाग, सशक्तीकरण आणि सकारात्मक ऊर्जा अधिक बळकट होईल. दोन्ही राज्यांती
No comments:
Post a Comment