शासकीय
योजनांच्या लाभार्थ्यांना
राष्ट्रीयकृत
बँकखात्याचा तपशिल देणे अनिवार्य
:
तहसिलदार कैलास देवरे
चाळीसगाव दि. 10
(उमाका वृत्तसेवा) : शासनातर्फे इंदिरा
गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ, विधवा, अपंग निवृत्ती वेतन योजना व महाराष्ट्र
शासनाकडील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणा-या राज्य
पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृध्दापकाळ योजनेंतर्गत चाळीसगाव
तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांची अद्यापपावेतो आपले राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक व
आधारकार्डची झेरॉक्स तहसिल कार्यालय, चाळीसगाव येथील संजय गांधी शाखेत जमा
करावयाचे राहिले असतील अशा चाळीसगाव तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी दिनांक 25 मार्च 2017 पर्यंत
आपले आधार कार्ड व राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स त्वरीत तहसिल कार्यालयातील संजय गांधी
शाखेकडे जमा करण्याचे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी केले आहे.
शासन ध्येय धोरणानुसार 1 एप्रिल,2017
पासुन DBT अन्वये लाभार्थ्याना अनुदान देण्याच्या सूचना असल्याने लाभार्थ्यांचे
खाते पोस्ट अगर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असतील अशा सर्व लाभार्थ्यांनी त्वरीत राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून जुने व
नवे पासबुक व आधारकार्डची झेरॉक्स तहसिल कार्यालतील संजय गांधी योजना शाखेकडे जमा
करावी.
तरी सर्व संबंधित लाभार्थ्यांनी
राष्ट्रीयकृत बँक खात्याचा तपशिलासह आधारकार्डची झेरॉक्स, संजय गांधी शाखेकडे
दिनांक 25 मार्च, 2017 पर्यंत जमा करावी अन्यथा त्यांचे माहे एप्रिल 2017 नंतरचे
अनुदान बंद होवू शकते याची सर्व संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी असे तहसिलदार
श्री.कैलास देवरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment