चाळीसगाव
येथे जागतिक ग्राहक
दिनाच्या
कार्यक्रमाचे आयोजन
:
तहसिलदार कैलास देवरे
चाळीसगाव दि. 10
(उमाका वृत्तसेवा) : ग्राहक अन्यायाविरुध्द उपाय योजना करतांना जागृत ग्राहक, संघटीत
ग्राहक शक्ती, ग्राहक कायद्याचे ज्ञान व त्याअनुषंगाने समाज समर्पित जागृत ग्राहक निर्मीतीसाठी जागतिक
ग्राहक दिनाचे औचित्य साधत दिनांक
15 मार्च, 2017 रोजी जागतिक ग्राहक दिन 2017 साजरा करण्यात येत आहे. तहसिल कार्यालयात सकाळी 11:00 वाजता
ग्राहकांचे प्रबोधन, चर्चासत्र व प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाचे आयोजन
तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले आहे.
या
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी शरद पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून
नगराध्यक्षा आशालता चव्हाण, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव बाबासाहेब चंद्रात्रे,
व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती
रविंद्र पाटील, ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष रमेश सोनवणे, ग्रंथमित्र आण्णा
धुमाळ उपस्थित राहणार आहेत.
या
जागतिक ग्राहक दिनानिमीत्ताने ग्राहक प्रबोधनाकरिता वजनमाप, अन्न व भेसळ, गॅस
संबंधीचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. ग्राहक प्रबोधनामध्ये ग्राहकांचे हक्क, ग्राहकाने खरेदी करतांना
घ्यावयाची काळजी, ग्राहक संरक्षण कायदा, तक्रार कोण करु शकतो, तक्रार कोठे दाखल
करावी, अपील कसे दाखल करावे या बाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होऊन जागृत
ग्राहक निर्मीतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील
अधिकाधिक नागरिकांनी, ग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार कैलास
देवरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment