भडगांव
येथे मुद्रा लोन मेळाव्याचे आयोजन
सुशिक्षीत
बेरोजगारांनी लाभ घ्यावा : तहसिलदार वाघ
चाळीसगाव दि. 27 (उमाका वृत्तसेवा) : तहसिल कार्यालय, भडगांव यांच्या वतीने
गुरूवार दिनांक 30 मार्च, 2017 रोजी लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालय, भडगांव येथे मुद्रा
लोन योजनेच्या अनुषंगाने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन
सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते होणार आहे.
या
मेळाव्याचे अध्यक्षस्थानी विधानसभा सदस्य किशोर पाटील उपस्थित राहणार असून यावेळी प्रमुख
पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुनिल पाटील, पंचायत समितीचे सभापती,
जि.प.सदस्य, नगरपालीकेचे नगराध्यक्ष तसेच सर्व पं.स.सदस्य, नगरसेवक आदी उपस्थित राहणार
आहेत. सदर मेळावा रोटरी क्लब पाचोरा/भडगांव व मास्टरलाईन फाऊंडेशन भडगांव यांचे सहकार्याने
आयोजित केलेला असून पाचोरा भडगांव रोटरी क्लबचे अध्यक्ष सुयोग जैन तसेच युवा उद्योजक
समीर जैन हे मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.
सुशिक्षीत
बेरोजगार युवक-युवतींना शासनाच्या ध्येय धोरणानुसार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
व्हाव्यात आणि त्यातुन उद्योजक निर्माण व्हावेत या उदात्त हेतुने मा.प्रधानमंत्री यांचे
संकल्पनेतून केंद्रशासनाने 8 एप्रिल, 2015 रोजी मुद्रा बँक योजना कार्यान्वित केली
आहे. या योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच योजनेची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत
पोहचावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी लाभार्थ्यांना
योजनेची माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे विविध
बँकांचे स्टॉल देखील या ठिकाणी उभारण्यात येणार असून त्या माध्यमातून सर्व प्रकारची
माहिती व अर्थ सहाय्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात
येणार असल्याने तालुक्यातील स्वयंरोजगार, व्यवसाय करणाऱ्या युवक-युवतींनी तसेच होतकरु
बेरोजगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून
मुद्रा लोन मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन भडगांवचे तहसिलदार सि.एम.वाघ यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment