चाळीसगाव
नगरपरिषदेत जागतीक महिला दिनी
दिनदयाळ
अंत्योदय योजना अभियान संपन्न
चाळीसगाव दि. 10
(उमाका वृत्तसेवा) : जागतीक महिला दिनाचे
औचित्य साधत चाळीसगाव नगरपरिषदेने दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी
उपजीवीका अभियानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.आशालता चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषदेचे
मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग व नगरसेवक
राजेंद्र चौधरी होते.
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित सर्व
मान्यवरांनी दिप प्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करून केले. चाळीसगाव
शहरात दिनदयाळ अत्योंदय योजना –राष्ट्रीय नागरी उपजीवीका अभियानांतर्गत एकता महिला
वस्तीस्तर संघ, श्री.गणेश महिला वस्तीस्तर संघ, जिजाऊ महिला वस्तीस्तर संघ, संघर्ष
महिला वस्तीस्तर संघ या बचत गटांच्या संघाना नोंदणी प्रमापत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
महिला बचत गटांच्या शहरस्तर संघाच्या
अध्यक्षा संगीता अमृतकार यांनी आपल्या
मनोगतात इतिहातील महान स्त्रियांचे दाखले देवून समाजाच्या जडण-घडणीत महिलांचे
योगदान स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय सांगळे
यांनी केले तर आभार प्रदर्शन शितल पाटील यांनी केले .कार्यक्रम यशस्तीतेसाठी
सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरणकुमार निकुंभ, सोनाली मोगलाईकर, रोहिणी फिरके यांनी
परिश्रम घेतले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment