निवडणूक कामासाठी लागणारे
विविध परवाने मिळणार एक खिडकी कक्षात
चाळीसगांव,दिनांक 16 :- विधानसभा निवडणुक 2014 च्या अनुषंगाने निवडणूक कामी
विविध शासकीय विभागांमार्फत विविध परवाने तसेच ना-हरकत दाखले एकाच ठिकाणी मिळण्यासाठी
017 चाळीसगांव विधानसभा मतदार संघाकरिता तहसिल कार्यालय, चाळीसगांव येथे एक खिडकी
कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचे प्रमुख नायब तहसिलदार नानासाहेब आगळे
तर सहाय्यक म्हणून श्रीमती के.बी.परदेशी यांची नेमणूक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी
केली आहे. प्रादेशिक परिवहन विभाग, नगर परिषद, पोलीस स्टेशन चाळीसगांव व मेहुणबारे,
पंचायत समिती या विभागातील प्राधिकृत अधिकारी, कर्मचारी या एक खिडकी कक्षात
कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून विविध विभागामार्फत देण्यात येणारे परवाने जसे
वाहन परवाना, बॅनर, होर्डींग, प्रचार सभा, रॅली आदींसाठी लागणा-या परवानग्या एकाच ठिकाणी
मिळणार असल्याने वेळेचा अपव्यय व गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे. या एक खिडकी
कक्षाचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी तथा
प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.
महाविद्यालयीन
स्तरावर मतदार नोंदणी कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद
महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आलेल्या
नवमतदार नोंदणी कार्यक्रम आज शहरासह ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये राबविण्यात
आला. दिनांक 01 जानेवारी, 2014 रोजी ज्या विद्यार्थ्यांचे
वय 18 वर्षे पुर्ण आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणींचे आयोजन करण्यात आले
होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. या
कार्यक्रमासाठी तालुक्यातील 13 राजपत्रीत तर 39 अराजपत्रीत अधिकारी कर्मचा-यांची
नियुक्ती करण्यात आली होती. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज
घोडे पाटील यांनी कळविले आहे.
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment