एक गाव एक गणपती ही 32 वर्षापासूनची
परंपरा जपणारे आदर्श गाव तळेगांव
पालकमंत्री : ना.संजय सावकारे
चाळीसगाव,दिनांक 04:- एक विचारसरणी मुळे गावाचा
विकास निश्चीत साधता येत असतो एक गाव एक गणपती ही 32 वर्षापासूनची परंपरा जपणा-या
चाळीसगांव तालुक्यातील तळेगांवचा एकोपा पाहून तळेगांवचा आदर्श सर्व जिल्हयातील
गावांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री
ना.संजय सावकारे यांनी आज तळेगांव येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी
केले. या कार्यक्रमास आमदार राजीव देशमुख, जेडीसीसी बँकेचे संचालक प्रदिप देशमुख,
सरपंच अतुल देशमुख, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, उप नगराध्यक्ष सिताराम अजबे, सभापती
पंचायत समिती विजय जाधव, सभापती मार्केट कमिटी आर.एल.पाटील उपसभापती मार्केट
कमिटी झालम पाटील, महानंदाचे संचालक प्रमोद पाटील आदि उपस्थित होते.
सर्व
प्रथम तळेगावचे वटवृक्ष म्हणून संबोधल्या जाणारे स्व.बंडु नाना देशमुख यांच्या
प्रतिमेचे पुजन करुन ना.सावकारे म्हणाले की, जात, पात, धर्म विसरून गावाचा विकास
साधणारे आदर्श व्यक्तीमत्व गावचे सरपंच अतुल देशमुख व माजी सरपंच सोनाली देशमुख हे
कौतुकास पात्र असून त्यांनी गावात राबविलेले उपक्रम असेच पुढे सुरु ठेवावे. घटना
दुरुस्ती नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेल्या अधिकाराचा पुरेपुर वापर करुन
विकास साधणारे गाव म्हणून तळेगांव व चाळीसगांव नगर परिषदेचाही त्यांनी आपल्या
भाषणातून गौरव केला. देशमुख कुटूंबाने तळेगावातील नागरिकांचा ख-या अर्थाने विकास
साधुन त्यांचा विश्वास संपादन केला आहे. निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगे बाबा
ग्राम स्वच्छता पुरस्कार व नुकताच मिळालेला तंटामुक्त गाव पुरस्कार या पुरस्काराचे
मानकरी सरपंचासोबत सर्व ग्रामपंचात सदस्य, पंचायत समिती व जिल्हा परिषद
सदस्यांचेही पालकमंत्री ना.सावकारे यांनी अभिनंदन केले.
यावेळी
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजीव देशमुख यांनी गावातील सर्व विकास कामांची
विस्तृत माहिती देतांना गावातील मुलभूत गरजा ओळखुन रस्ते, विज, पाणी, शाळा या
गोष्टींना प्राधान्य देण्यात आल्याचे सांगितले. प्रत्येक गावाच्या विकासाबरोबर
संपुर्ण तालुक्याचे नेतृत्व करतांना जाहिरनाम्याची पुर्तता केल्याचा आनंद असून
शहराचा पिण्याच्या पाण्यासोबत वर्षानुवर्षे रखडलेल्या वरखेडे येथील धरणाचा प्रश्न
मार्गी लागल्याचा आनंदही त्यांनी त्यांचा भाषणातून व्यक्त केला.
यावेळी
जेडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप देशमुख, अनिल कासार, आर.एल.पाटील यांची समायोचित
भाषणे झाली. तर तळेगांवचे आजी माजी सरपंचाचा पालकमंत्री ना.संजय सावकारे यांच्या
हस्ते सत्कार करुन गौरविण्यात आले.
या
कार्यक्रमाला श्रीमती पुष्पा वाघ, किशोर पाटील, बाजीराव दौंड, भोजू शेठ, रामचंद्र
जाधव, दिलीप चौधरी, मंगेश राजपूत, दहिवदचे सरपंच बारकु बापुजी, सुरेश चौधरी, किशोर
देशमुख,विश्वास चव्हाण, हाजी गफ्फुर, वसंत चव्हाण, प्रशांत पाटील, हरिनाना
देशमुख,दिलीप देशमुख, अरुंधती पाटील, आर.के.मोराणकर, सी.बी.साळुंखे आदि मान्यवरांसोबत पंचक्रोशीतील सरपंच,
ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्रयांच्या हस्ते चाळीसगांव शहरासोबत
पातोंडा व वाघळी येथील विकास कामांचा शुभारंभ
दरम्यान चाळीसगांव शहरातील संजय गृहनिर्माण सहकारी
सोसायटी व शिवाजी चौक ते भडगांव रस्ता या
कामांचे रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला तर
तितुर नदीवरील ओझर-पातोंडा-वाघळी दरम्यान 2 कोटी 65 लाख रुपये खर्चाच्या पाच
बंधा-यांचे भुमिपूजनही ना.सावकारे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यामुळे भुजल पातळी
वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे प्रमोद पाटील यांनी यावेळी सांगितले
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment