सैन्य
भरतीचे आयोजन
जळगाव, दि. 2 :- स्टीवार्ड, कुक, टोपास
(सफाईवाला) या पदांकरिता एस आर / एनएमआर -01 /2015 (नौसैनिक) बॅच करिता भारतीय
नौसेनेत भरती होण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. 17 ते 21 या वयोगटातील ( ज्यांचा जन्म 1 एप्रिल 1994 ते 31
मार्च 1998 या कालावधीत झालेला आहे) अशा होतकरु हुशार अविवाहित युवकांनी लाभ
घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर मिलिंदकुमार बडगे यांनी केले
आहे.
ट्रेड - स्टीवार्ड (वेटर), कुक ( स्वयंपाकी)
शिक्षण इयत्ता 10 वी पास, टोपास (
सफाईवाला) इयत्ता 6 वी पास भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, शारिरिक स्वास्थ परिक्षण
( पी. एफ. टी.) शारिरीक सुदृढतेच्या आधारे केली जाईल, भरतीसाठी अर्ज करण्याकरिता व
अर्ज डाऊनलोड करण्याकरिता नौसेनेची वेबसाईट www.nausena_bharti.nic-in या संकेतस्थळरावर जाऊन करावा.
* * * * * * * *
वाहन
योग्यता प्रमाणपत्राची विशेष तपासणी मोहिम
जळगाव दि. 2 :- विशेष तपासणी मोहिम
दिनांक 1 ते 31 जुलै या कालावधीत वाहनांच्या
योग्यता प्रमाणपत्रांची राबविण्यात येणार आहे.
तपासणी मोहिम दरम्यान दोषी वाहनांवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अशी वाहने रस्त्यावर
वापर होणार नाही यासाठी परिवहन आयुक्तांच्या आदेशान्वये ही मोहिम राबविण्यात येणार
आहे.
जिल्हयातील सर्व परिवहन संवंर्गातील वाहन
मालकांनी वाहनांचे वैध योग्यता
प्रमाणपत्राशिवाय वाहने रस्त्यावर आणू नयेत. कायदेशिर कारवाई टाळण्यासाठी वाहनांची
योग्यता प्रमाणपत्र तपासणी तातडीने करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
श्री. सुभाष वारे यांनी केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment