संभाव्य टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी
प्रशासनाने सज्ज रहावे !
: जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल
चाळीसगाव, दिनांक
7 जुलै :- लांबलेला पाऊस आणि
त्यामुळे निर्माण होवू घातलेली संभाव्य
दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर मात
करण्यासाठी तालुका प्रशासनाने सज्ज रहावे अशा सुचना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल
यांनी आज तहसिल कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्या आढावा बैठकीत केले.
यावेळी उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे,
नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, विजय सुर्यवंशी, सोनवणे, आदि उपस्थित होते.
याबैठकीत संभाव्य टंचाई परिस्थिती लक्षात घेता पिण्याच्या
पाण्याचे आरक्षणाबाबत आढावा घेऊन त्याचे सुक्ष्म
नियोजन करण्याबाबत त्यांनी अधिका-यांना
सुचना केल्या. प्रत्येक तालुक्यात टंचाई परिस्थितीचा आराखडा तयार करुन
उपाययोजना प्रस्तावित करण्याच्या सुचनाही जिल्हाधिका-यांनी यावेळी सर्व संबंधितांना केल्या.
यावेळी
मंडळ अधिकारी व तलाठयांना
मार्गदर्शन करतांना श्रीमती अग्रवाल म्हणाल्या की, महसूली तुट भरुन काढण्यासाठी वसुली मोहिमेवर
विशेष भर देण्यात यावा प्रामुख्याने मोबाईल टॉवर व गौण खणिज बाबतच्या वसुलीसाठी
प्रदान केलेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करुन उद्यिष्टपुर्ती करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. त्याचबरोबर नैसर्गिक
आपत्ती काळात पंचनामे करण्याची महत्वपुर्ण जबाबदारी तलाठयांवर असून त्यांनी ती
योग्य प्रकारे पार पाडावी. तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे
विविध प्रकारचे दाखले वितरणासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये दाखले वाटपासाठी कॅम्प
आयोजित करण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.
जिल्हाधिका-यांनी दिली सातबारा संगणकीकरण कक्षाला भेट
जिल्हाभरात राबविण्यात येत असलेल्या
सातबारा संगणकीकरणाच्या कामकाजाबात जिल्हाधिका-यांनी येथील संगणकीकरण कक्षाला भेट
देऊन तलाठी निहाय आढावा घेतला. व सातबारा संगणकीकरणाची कार्यवाही तात्काळ पुर्ण
करण्याच्या सुचना केल्या. सातबारा संगणकीकरणाच्या कामाबाबत जिल्हाधिका-यांनी
समाधान व्यक्त करुन मतदार नोंदणी कार्यक्रमाचीही माहिती जाणून घेतली. तसेच
कर्मचा-यांशी चर्चा करुन कामकाजाविषयी समस्या जाणून घेतल्या.
* * * * * * * *
टिप : सदर वृत्त व
छायाचित्र हे खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment