Monday, 21 July 2014

महिला लोकशाही दिनी 62 तक्रार अर्ज प्राप्त

महिला लोकशाही दिनी 62 तक्रार अर्ज प्राप्त

                    जळगाव, दि. 21 :- जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात  उपविभागीय अधिकारी, जळगाव फेर फार नोंद सबंधित -1, जिल्हा उपनिंबधक सहकारी संस्था, जळगाव  ठेवीदार पतसंस्था -61 असे एकूण 62 तक्रार अर्ज प्राप्त झाले सदर तक्रार अर्ज संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहे

* * * * * * * * *

पाऊस पडताच वृक्ष लागवडीस वेग

              जळगाव, दि.21 -  गेल्या आठवड्याभरापासून पावसास सुरुवात झाल्याने  जिल्ह्यातील अनेक भागात वृक्ष लागवडीस वेग आला आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे राबविण्यात येणा-या वृक्षलागवड अभियानांतर्गत पिंपरी धरणगाव परिसरात तब्बल 5000 वृक्ष लागवड करण्यात येत आहे.
सामाजिक वनीकरण विभागाच्या एरंडॊल क्षेत्राअंतर्गत पिंपरी धरणगाव या भागात रस्त्यांलगत वृक्ष रोप लागवडीस वेग आला आहे. बेहडा, कपोक, बकाम, जांभूळ, सिताफळ, शिसू, गुलमोहोर, चिंच, मोह, पिंपळ, वड, उंबर अशा जातीच्या वृक्षांची रोपे या ठिकाणी लागवड करण्यात येत आहेत. जी लागवड शेतक-यांच्या बांधालगत होत आहे, तेथे  शेतक-यांचा पसंतीस प्राधान्य दिले जात असून शेतक-यांना फळांचे उत्पन्न घेता येईल, अशी रोपे लावण्यात येत आहेत. सहाय्यक लागवड अधिकारी एस.ए.चोधरी, बी.के.गुजर व त्यांचे सहकारी या लागवड प्रक्रियेवर जातीने लक्ष ठेवून आहेत.

* * * * * * * * *

No comments:

Post a Comment