महाराष्ट्र
हे देशातील फळबागाचे केंद्र असणारे एकमेव राज्य
:
माजी केंद्रीय
कृषिमंत्री ना. शरद पवार
फलोत्पादन
महापरिषदेचा उद्घाटन सोहळा संपन्न
नाशिक दि.19- भारत हा कृषिप्रधान देश आहे.
सकाळ-ॲग्रोवन आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आयोजित हॉर्टिकल्चर
कॉन्फेक्स (फलोत्पादन परिषद) म्हणजे गेल्या
25 वर्षापूर्वी सुरु केलेल्या फलोत्पादन शेतीच्या क्रांतीला आलेले एक फळ आहे. आज
महाराष्ट्र हे फलोत्पादनात देशात झेंडा फडकवणारे राज्य आहे. महाराष्ट्र हे हिंदूस्तानातील
एकमेव फळबागांचे केंद्र असणारे राज्य आहे,असे प्रतिपादन, माजी केंद्रीय कृषिमंत्री
शरद पवार यांनी केले.
सकाळ-ॲग्रोवन
आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आयोजित फलोत्पादन परिषद
(हॉर्टिकल्चर कॉन्फेक्स) चे उदघाटन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त
विद्यापीठाच्या आवारात आज माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे हस्ते झाले. याप्रसंगी श्री. पवार बोलत होते.
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व
पर्यटनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ, फलोत्पादन मंत्री जितेंद्र
आव्हाड, वनाधिपती विनायकदादा पाटील, तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. ए. टी.
पवार, आ. हेमंत टकले, जि.प.अध्यक्षा जयश्री पवार, माजी कृषी मंत्री रणजित देशमुख,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अरुण जामकर, म.वि.प्र
च्या सरचिटणीस निलिमाताई पवार, सकाळचे संपादक संचालक उत्तम कांबळे,कार्यकारी
संपादक श्रीमंत माने आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी श्री. पवार म्हणाले की,
आपला देश हा गहू निर्यात करणारा देश आहे. तसेच तांदूळ निर्यातीत भारताचा प्रथम
क्रंमाक तर कापूस व साखर निर्यात करण्यात दुसरा क्रंमाक लागतो. या निर्यातीच्या
माध्यमातून आपण देशाला परकीय चलन द्यायला लागलो. आपण अन्नधान्याची उत्पादने वाढवतो
आहे पण याच बरोबर भाजीपाला, फळे, मांस, अंडी या क्षेत्रांची ही वाढ करायला हवी.
फलोत्पादनात प्रगती करण्यासाठी रोहयो व फलोत्पादन शेती याची सांगड घातली व याचा
फायदा शेतकऱ्यांना झाला. रा्ष्ट्रीय फळबाग अभियान या नावाचा कार्यक्रम संपूर्ण
देशात राबविला संपूर्ण देशाला याचा फायदा झाला व महाराष्ट्र त्यात अग्रेसर होता. आंबा,
चीकू, द्राक्ष, डाळींब या फळांचे क्षेत्र व निर्यातीत महाराष्ट्र प्रथम क्रंमाकावर
आहे. आंतरराष्ट्रीय मानाकंन प्राप्त करण्यात महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर आहे
असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
श्री.
पवार म्हणाले की, यंदा दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने
मंत्र्यांनी दुष्काळ भागात फळबागा असतील तर त्या वाचविण्याचा प्रयत्न करावा अशी
सूचना त्यांनी यावेळी केली. निसर्गाची संकटे येतात तेव्हा सरकारने व शासकीय
यंत्रणानी जागृत असावे. कारण निसर्गाच्या लहरीपणाने जी आपत्ती निर्माण होते त्याची
सर्वात जास्त झळ ही फळाबागांनाच पोहचते. आपत्तीत फळबागांची कशी काळजी घ्यावी
,फळबागा वाचवता कशा येतील यावर संशोधन ,मार्गदर्शन करण्यासाठी रांची व बारामती
येथे संस्था उभारण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दोन दिवस चालणाऱ्या
या परिषदेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र फळांच्या बाबतीत अग्रसेर-
पालकमंत्री छगन भुजबळ
सकाळ-ॲग्रोवन आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने
फलोत्पादन परिषद आयोजित केलेले उपक्रम स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्र फळांच्या
बाबतीत अग्रेसर असे राज्य आहे. त्यात नाशिक जिल्हयाचे द्राक्ष, डाळींब, भाजीपाला
परेदशात निर्यात होत आहे.केंद्रशासनाच्या माध्यमातून फळे हे जागतिक बाझार पेठेत
जातील ते नाकारण्यात येणार नाही याची काळजी घ्यायला हवी अशी अपेक्षा व्यक्त करुन
त्यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्यात.
|
फलोत्पादनात नाशिक जिल्हा अग्रसेर-
फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड
गेल्या
20 वर्षात नाशिक जिल्हयाने फलोत्पादन क्षेत्रात खूप प्रगती केली. त्यामुळे अधिक
बळ शेतकऱ्यांना मिळाले. महाराष्ट्रातील फळे देशाबाहेर जातात हा या मातीचा सन्मान
आहे. 25 वर्ष झालेल्या फलोत्पादन क्षेत्राच्या क्रांतीला पुढे नेण्याची आवश्यकता
आहे. अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्यात
|
यावेळी सकाळ ॲग्रोवन ‘बरकत’ या स्मरणिकेचे प्रकाशन
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आहे. या परिषदेस फलोत्पादन क्षेत्रातील तज्ञ,
महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील शेतकरी बांधव उपस्थित होते. परिषदेचे प्रास्ताविक
सकाळ वृत्तपत्राचे काय्रकारी संपादक श्रीमंत माने यांनी केले तर आभार विद्यापीठाचे
कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी मानले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment