सिंहस्थ
कुंभमेळयासाठीची कामे दर्जेदार स्वरुपाची करावीत !
: उपमुख्यमंत्री - अजित पवार
नाशिक दि 30 :- सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने होणारे
विकास कामे अधिक दर्जेदार स्वरुपाची व वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित
यंत्रणानी प्रयत्नशिल रहावे असा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील नियोजन भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ
कुंभमेळा आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री
तथा जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ, आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, जिल्हा
परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, महानगरपालिका आयुक्त
डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी सुखदेव बनकर, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सारंगल, पोलिस अधिक्षक (ग्रामीण)
संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, सिंहस्थ कुंभमेळा अधिकारी
महेश पाटील, उदय किसवे आदि अधिकारी उपस्थित होते.
सिंहस्थ
कुंभमेळाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या निधीतून विविध विकास कामे सुरू आहेत. केंद्र शासनाचाही निधी सिंहस्थासाठी मिळणार असून
स्थानिक स्वराज्य संस्था ही निधी उपलब्ध करुन देणार आहेत. त्यामुळे ही विकास कामे
शहराच्या वैभवात भर घालतील. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असे श्री.
पवार यांनी सांगितले.
सिंहस्थ
कुंभमेळामुळे नदी घाट, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या सारखी विविध कामे कायम स्वरुपी
होत असल्याने शहराच्या विकासात भर पडणार
असून त्यांचा फायदा शहारातील नागरिकांना होणार आहे असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी
सिंहस्थ कुंभमेळा निमित्त हाती घेतलेले कामे, त्यांची प्रगती, उपलब्ध निधी आदिची
माहिती विभागीय आयुक्त एकनाथ डवले, महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस
आयुक्त कुलवंतकुमार सारंगल, जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली.
No comments:
Post a Comment