मागासवर्गीय मुलींना वसतीगृहातील प्रवेशासाठी आवाहन
चाळीसगाव, दिनांक 2 जून :- महाराष्ट्र
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या
मान्यतेने कार्यरत असलेले मंदोदरी कन्या छात्रालय, चाळीसगांव येथे इ.5 वी ते 10 वी
च्या वर्गातील प्रवेशेच्छुक विद्यार्थिनींना
मोफत प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन मंदोदरी कन्या छात्रालयाचे सचिव अशोक खलाणे यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
सदर वसतीगृहात
निवासाची तसेच भोजनाची विनामुल्य सोय असुन प्रवेशासाठी तालुक्यातील अनु.जाती, अनु.जमाती व भटके विमुक्त जातीतील विद्यार्थीनींनी वा
पालकांनी मंदोदरी कन्या छात्रालय,
जयहिंद हायस्कुल जवळ, विद्युत सरीता कॉलनी , धुळे रोड, चाळीसगांव दुरध्वनी क्रं. 02589-227939 येथे संपर्क
साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment