राष्ट्रीय पिक
विमा योजनेत सहभागासाठी 30 जून पर्यंत मुदत
जळगाव, दि. 24 :- केंद्र शासनाने
जाहीर केलेल्या नवीन राष्ट्रीय पिक विमा कार्यक्रमातंर्गत महाराष्ट्र शासन निर्णय
दिनांक 3 जुन 2014 अन्वये जळगाव जिल्हयाकरीता खरीप हंगामासाठी हवामान आधारित पिक
विमा योजना पथदर्शक स्वरुपात जळगाव जिल्हयातील कापूस, खरीप ज्वारी, उडीद व मुग या
पिकासाठी लागू करण्यात आली आहे. ही योजना
जळगाव जिल्हयातील सर्व शेतक-यांना लागू
असून विविध वित्तीय संस्थांकडून पिक कर्ज घेणा-या शेतक-यांना अधिसूचित पिकांकरीता
सक्तीची असून कर्ज न घेणा-या शेतक-यांसाठी ऐच्छिक स्वरुपाची आहे.
योजनेचे
उद्देश :- पिक पेरल्यापासून
पिक तयार होण्याच्या कालावधीत अपूरा पाऊस, पावसात पडणारा खंड, अति पाऊस या पासून
नुकसान झाल्यापासून योजनेच्या तरतूदी प्रमाणे शेतक-यांना विमा संरक्षण देऊन आर्थिक
स्थैर्य देणे, पिकाचे नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य
अबाधित राखणे,
योजना
कार्यान्वित करणारी यंत्रणा :-
जळगाव जिल्हयाकरीता कपूस, खरीप ज्वारी, उडीत व मुग या पिकांचा समावेश असून भारतीय
कृषि विमा कंपनी , मुंबई यांचे मार्फत योजना
राबविण्यात येणार आहे. तसेच योजना अंतर्गत शेतक-यांना देय होणारी नुकसान भरपाईची
संपूर्ण रक्कम सुध्दा भारतीय विमा कंपनी, मुंबई यांचे मार्फत अदा करण्यात येणार आहे.
अधिसूचित क्षेत्रात महसूल मंडळ स्तरावर हवामान घटकाच्या नोंदी घेण्यासाठी
नोंदणीकृत त्रयस्थ संस्थे मार्फत स्वयंचलीत संदर्भ हवामन केंद्र उभारणी करणे
बाबतची कार्यवाही विमा कंपनी मार्फत केली जाणार आहे.
हवामान आधारित पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम 2014 करीता अधिसूचित
पिके, विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर, विमा हप्ता अनुदान व विमा हप्ता
अनुदान व विमा हप्ता शेतकरी हिस्सा रक्कम रु. पुढीलप्रमाणे राहील-
अधिसूचित महसूल मंडळ संख्या 86, अधिसूचित पिके कापूस, विमा संरक्षित रक्कम
22000 , वास्तवदर्शी विमा हप्ता प्रति हेक्टर, टक्केवारी 7.80, रक्कम रुपये
1716/-, विमा हप्ता अनुदान रक्कम रु 686, विमा हप्ता शेतकरी हिस्सा 1030, अधिसूचित
मंडळसंख्या 86, अधिसूचित पिके खरीप ज्वारी विमा संरक्षित रक्कम
13000/- वास्तवदर्शी विमा हप्ता प्रति
हेक्टार टक्केवारी 11.60, रक्कम रुपये 1508, विमा हप्ता अनुदान रक्कम रु 754, विमा
हप्ता शेतकरी हिस्सा रक्कम रु. 754/-, अधिसूचित मंडळ संख्या 86 अधिसूचित पिके
उडीद, विमा संरक्षित रक्कम 13000/-,
वास्तवदर्शी विमा हप्ता प्रति हेक्टर टक्केवारी 11.20, रक्कम रुपये 1456/-, सिमा
हप्ता अनुदान रक्कम रु. 728, विमा हप्ता शेतकरी हिस्सा 754/-,
अधिसूचित महसूल संख्या 83, अधिसूचित पिके मुग, विमा संरक्षित रक्कम
15000/-, वास्तवदर्शी विमा हप्ता प्रति हेक्टार टक्केवारी 7.40, रक्कम रुपये
1110/-, विमा हप्ता अनुदान रक्कम रुपये 444/- विमा हप्ता शेतकरी हिस्सा रक्कम
रुपये 666.
पिक विमा करणेसाठी अंतिम मुदत 30 जून 2014 आहे. तत्पूर्वी विमा हप्ता जवळील
राष्ट्रीयकृत बँकेत भरणा करावा असे आवाहन
उपविभागीय कृषि अधिकारी जळगाव यांनी केले
आहे.
* *
* * * * * * *
कर्मवीर दादासाहेब गायकवाड
पुरस्कार : 30 जून पर्यंत प्रस्ताव मागविले
जळगाव, दि. 24 :- राज्य शासनाने
सन 2014-15 मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे स्मरणर्थ भूमीहीन अनुसूचित जाती
व नवबौध्दच्या विकासाठी उल्लेखनीय व निस्वार्थीपणे काम करणा-या एका सेवाभावी कार्यकर्त्यास व एक सामाजिक संस्थेस पुरस्कार
देण्यात येणार आहे. जळगाव जिल्हयातील सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्थांकडून
कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुस्कारसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात काम करीत असलेल्या सामाजिक
सेवकाच्या व संस्थांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना व संस्थांना
त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरुन
सामाजिक उत्थानासाठी सामजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्था पुढे याव्यात म्हणून
दिला जातो.
इच्छूक सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी सामाजिक
न्याय भवन, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, महाबळरोड, मायादेवी मंदिरासमोर,
जळगाव येथे संपर्क साधावा, पुरस्करासाठी पुरुषाचे वय 50 व महिलांचे वय 40 पेक्षा
कमी नसावे.
सदर व्यक्ती आमदार, खाससादर किवा
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी नसावी. सामाजिक क्षेत्रात कमीत कमी 15 वर्षाचे काम
केलेले असावे. प्रस्ताव 3 प्रतीत दिनांक 30 जून 2014 पर्यंत सहाय्यक आयुक्त
समाजकल्याण, जळगाव, महाबळरोड, मायादेवी मंदिराजवळ, हतनूर कॉलनी, जळगाव यांचेकडे
सादर करण्यात यावे. उशिरा आलेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत असे आवाहन सहाय्यक
आयुक्त समाजकल्याण जळगाव यांनी केले आहे.
* *
* * * * * * *
No comments:
Post a Comment