Thursday, 19 June 2014

स्थानिक केंद्राची प्रारुप यादी जाहिर हरकती दाखल करण्यास 25 जुन पर्यंत मुदत

स्थानिक केंद्राची प्रारुप यादी जाहिर
हरकती दाखल करण्यास  25 जुन पर्यंत मुदत

                 जळगाव, दि. 19 :- भारत निवडणुक आयोगाने दि. 10 जून 2014 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोट निवडणुकीची घोषणा केली आहे.
               स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीचे व्यवस्थापन व त्यावर बारकाईने संनियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय स्तरावर मतदान केंद्र उभारण्यात यावे,अशा सूचना भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 24 फेब्रुवारी 2010 च्या पत्रान्वये दिल्या आहेत.  जिल्हयातील अमळनेर, फैजपुर, भुसावळ, जळगाव, एरंडोल, पाचोरा व चाळीसगाव या 7 महसुली उपविभागांच्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची प्रारुप यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी, जळगाव यांनी लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 25 नुसार दिनांक 19 जून 2014 रोजी प्रसिध्द केली आहे.
                ज्या कोणास मतदान केंद्राच्या प्रारुप यादीवर हरकती घ्यावयाची असल्यास दिनांक 19 ते 25 जून 2014 या कालावधीत जिल्हा निवडणुक अधिकारी, जळगाव यांचे कार्यालयात दाखल करता येईल.
                प्रसिध्द करण्यात आलेली मतदान केंद्राची प्रारुप यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी कार्यालय, जळगाव, जिल्हा परिषद जळगाव, जळगाव शहर महानगर पालिका जळगाव, उपविभागीय अधिकारी यांची कार्यालये, तहसिल कार्यालये, पंचायत समिती कार्यालये , नगर पालिका कार्यालये ठिकाणी  पाहण्यासाठी उपलब्ध आहे, असे जिल्हा निवडणू अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी कळविले आहे.

* * * * * * * * *

स्थानिक केंद्राची प्रारुप यादी मंजूरीसाठी 25 जून रोजी बैठक

               जळगाव, दि. 19 :-  जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदार संघातील पोट निवडणूकीकरीता मतदान केंद्राची प्रारुप यादी तयार करण्यात आलेली असून सदर यादी मंजूरीकरीता भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांना पाठवावयाची आहे. सदर प्रारुप यादीवर चर्चा करण्यासाठी जिल्हा निवडणुक अधिकारी जळगाव याचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दिनांक 25 जून 2014 रोजी दुपारी 2-00 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर बैठकीस  मान्यता प्रापत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा निवडणुक अधिकारी  श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले आहे.


* * * * * * * * *

No comments:

Post a Comment