Saturday, 17 May 2014

जिल्हा नियोजन समितीची बैठक 27 मे रोजी

जिल्हा नियोजन समितीची बैठक 27 मे रोजी

                जळगाव, दि. 17 :- जिल्हा नियोजन समितीची बैठक दिनांक 27 मे 2014 रोजी दुपारी 2.00 वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे  राज्याचे कृषी, पशुसंवर्धन दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य, विमुक्त / भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याणमंत्री तथा पालकमंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित केली आहे.  तरी संबंधितानी बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा  सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती, श्रीमती रुबल अग्रवाल  यांनी केले आहे.
* * * * * * * * *

शासकीय कार्यालय आस्थापनांना सेवापुस्तक - वेतनपडताळणीचे आवाहन

                जळगाव, दिनांक 17 :- वेतन पडताळणी पथक नाशिक  या कार्यालयात माहे एप्रिल 2014 पर्यंत कार्यालय प्रमुखांनी सादर केलेली सेवापुस्तके पडताळून निस्कर्ष  नोंदविलेले आहेत. मात्र काही कार्यालयांनी अदयापही सदरची पुस्तके प्राप्त केली नाही. ज्या कार्यालयाकडून एप्रिल 2014 पर्यंत सेवापुस्तके वेतन पडताळणी पथक नाशिक यांचेकडे पडताळणी करीता जमा केली आहेत अशा कार्यालयांनी त्यांची सेवापुस्तके वेतन पडताळणी पथक नाशिक या कार्यालयाकडे प्राधिकार पत्रासह प्रतिनिधी पाठवून प्राप्त करण्याची व्यवस्था करावी.
               जळगाव जिल्हयातील  ज्या शासकीय  कार्यालयांनी त्यांचे आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचारी यांचे सेवापुस्तकांची पडताळणी करुन घेतलेली नाही. अशा कार्यालयांनी त्वरीत संबंधित धारकांची वेतन पडताळणी करुन घ्यावी असे आवाहन बाळासाहेब घोरपडे सहसंचालक लेखा व कोषागारे नाशिक विभाग, नाशिक यांनी केले आहे.
* * * * * * * * *

शेतक-यांसाठी बियाणे तक्रार निवारण कक्ष कार्यान्वीत

                जळगाव, दिनांक 17 : विभागीय कृषि सह संचालक, नाशिक विभाग, नाशिक या कार्यालयात खरीप हंगाम 2014-15 साठी नाशिक विभागाकरीता शेतक-यांसाठी बियाणे तक्रार निवारण कक्ष दिनांक 15 मे 2014 पासून विभागीय कृषि सहसंचालक कार्यालय नाशिक रोड येथे स्थापन करण्यात आला आहे. सदर कक्षात बियाणे खते व किटके यांचा पुरवठा व दर्जा बाबतच्या तक्रारी समक्ष अथवा दूरध्वनीव्दारे शेतक-यांनी सकाळी 10.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत नोंदव्याव्यात. यावेळी कृषी पर्यवेक्षक डी. बी. मोरे, उपस्थित राहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 8087910868, कार्यालयीन दुरध्वनी क्र. 0253- 2468361/62 येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक यांनी केले आहे.
* * * * * * * *

जी. डी. सी. ॲड ए. व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा प्रवेश पत्रासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

          जळगाव, दि. 17:- सहकार खात्या मार्फत घेण्यांत येणारी जी. डी. सी. ॲड ए व सहकारी  गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 24, 25 व 26 मे 2014 रोजी लेवा एज्युकेशन युनियन लि. संचालित नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव येथे घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या पात्र परीक्षार्थींना त्यांची प्रवेश पत्रे पाठविण्यांत आलेली आहेत. ज्या परीक्षार्थींचे प्रवेश पत्र वेळेवर प्राप्त झालेले नाहीत अशा परीक्षार्थींना इतर ओळखपत्र ( पॅनकार्ड, मतदान कार्ड,ड्राईविंग लायसन्स, कॉलेजचे ओळखपत्र) सादर केल्यास परीक्षेस बसता येईल.  तरी ज्या परीक्षार्थींना टपाल खात्याची दिरंगाई वा अन्य काही कारणांमुळे प्रवेश पत्र मिळाले नसतील अशा परिक्षार्थींनी परिक्षेसाठीचा आसन क्रमांक प्राप्त करुन घेणेसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव प्रशासकीय इमारत, टप्पा क्रमांक 3, पहिला मजला, आकाशवाणी चौकाजवळ, जळगाव ( दुरध्वनी क्रमांक 0257- 2239729 ) यांचे व्यक्तीश : संपर्क साधावा प्रवेश पत्र  न मिळाल्यामुळे परीक्षेस बसता आले नाही अशा कोणत्याही तक्रारींची दखल बोर्डाकडून घेतली जाणार नाही व त्याबाबतची जाबाबदारी बोर्डावर रहाणार नाही याची परीक्षार्थीनी नोंद घ्यावी , असे  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी कळविले आहे.
* * * * * * *

19 मे रोजी महिला लोकशाही दिन

           जळगाव, दि. 17 :-  जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 19 मे 2014 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधीत समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी चौकाजवळ जळगाव, दूरध्वनी क्र. 0257- 2228828  यांनी केले आहे.                                                      
* * * * * * *

पणन महासंघाचे महाकॉट कापूस बियाणे उपलब्ध

                    जळगाव, दिनांक 17 :- कापसाचे उत्पादन मोठया प्रमाणात व्हावे यासाठी कापूस पणन महासंघाने खरीप हंगाम 2012 व 2013 पासून खान्देश विभागात महाकॉट बियाणे उपलब्ध करुन दिले होते. सदर वाणाची भरघोस विक्रमी उत्पन्नमुळे शेतक-यांची वाढती मागणी लक्षात घेता खरीप हंगाम 2014 साठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग व जिल्हा कृषी अधिक्षक यांच्या मदतीने कृषी सेवा केंद्रांमार्फत शेतक-यांपर्यंत  बियाणे पोहचविण्याकरीता शासन अंगीकृत व्यवसायाला सक्रीय सहभाग दर्शविलेला आहे.
              कापुस उत्पादक कास्तकारांसाठी पणन महासंघाने खाजगी कृषी सेवा केंद्रांमार्फत महाकॉट , महाकॉट सुपर, महाकॉट -जल या तीन वाणंची उपलब्धता करुन दिलेली आहे. कापूस उत्पादक शेतक-यांनी नजीकच्या कृषी केंद्रावर उपलब्ध बियाणे खरेदी करावी, असे आवाहन जळगाव विभागाचे संचालक ॲड. रविंद्र पाटील,  कुणाल पाटील , तसेच संचालिका उषाताई शिंदे यांनी केले आहे.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment