शनिवार 3 ऑगस्ट, रोजी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली 'दिशा' ची बैठक
जळगाव, दिनांक 2 ऑगस्ट ( जिमाका ) - केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई निखील खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ' दिशा' (जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती) ची बैठक दिनांक 3 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात येतो. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणाचे प्रमुख उपस्थित असतात.
0 0 0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment