25 ऑगस्ट रोजी जळगावात सोहळा
नवी दिल्ली 23 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर राहणार आहेत. या दौ-या दरम्यान जळगाव येथे 11 लाख दिदींनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा सन्मान म्हणून, श्री. मोदी त्यांचा सत्कार करतील.
ज्या कष्टाळू महिलांनी स्वबळावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपये कमवले आहेत व त्यांनी त्यांच्या कुटुबांला हातभार लावत, कुंटुंबियाना गरीबीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात मदत करुन, समाजात एक आदर्श निर्माण केला आहे, अशा लखपती दिदींचा श्री. मोदी जाहीर रित्या सन्मान करतील अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवार रोजी पत्रकार परिषद घेऊन दिली.
या कार्यक्रमात पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी आणि 5000 कोटी रुपयांचे बँक कर्ज जाहीर करणार असल्याचे श्री चौहान यांनी सांगितले. यामुळे 4.3 लाख बचत गटांच्या 48 लाख सदस्यांना तसेच 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना लाभ होईल.
शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच 1 कोटी लखपती दीदी तयार केल्या आहेत आणि आगामी 3 वर्षांत 3 कोटी लखपती दीदींना तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
या कार्यक्रमामध्ये 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जिल्हा मुख्यालये आणि सीएलएफ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील.
15 लाख नवीन लखपती दीदींची यादी राज्यनिहाय उपलब्ध असून यात महाराष्ट्रातील 1,04,520 लखपती दीदींचा समावेश आहे.
00000000
No comments:
Post a Comment