Thursday, 22 August 2024

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

                                                   


                                                      मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची

'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदिनांक 22 :  मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मुलाखत 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात प्रसारित होणार असून पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही श्री. भुजबळ यांनी कार्यक्रमाद्वारे केले आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातील मुलाखतीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.भुजबळ यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची वैशिष्ट्येकार्यपद्धती तसेच याद्वारे होणारे लाभ याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.


            दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखतशुक्रवार दि.23, आणि शनिवार दि. 24 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 23 गस्ट 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेद सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.


000000000000

No comments:

Post a Comment