मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांचे ओझर विमानतळ येथे आगमन
नाशिक, दिनांक 23 ऑगस्ट,2024 (जि.मा.का. वृत्तसेवा) : महिला सशक्तीकरण अभियान महाशिबीरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी आमदार सीमा हिरे, आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे व श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.
0000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment