मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यातून लाईव्ह बैठक ;
जळगाव जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्र्यासह, ग्रामविकास मंत्री,
मदत व पुनर्वसन मंत्री असणार उपस्थित
जळगाव,
दिनांक 16 ऑगस्ट ( जिमाका वृत्त ) : मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र लाभार्थी बहिणीच्या बँक खात्यावर जमा होत असून
17 ऑगस्टला संपूर्ण पात्र महिलांच्या खात्यावर जुलै ते ऑगष्ट, 2024 या दोन्ही महिन्याच्या
लाभाची रक्कम पात्र महिलांना अदा होणार
आहे. त्या अनुषंगाने १७ ऑगस्ट रोजी पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख
उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या त्या जिल्ह्याच्या
ठिकाणी याचे लाईव्ह केले जाणार आहे.
जळगाव
येथे जिल्हास्तरावर पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,
ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख
उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री यांच्या लाईव्ह कार्यक्रमाचे दुपारी १२.०० वाजता जिल्हा
नियोजन समिती सभागृह येथे आयोजन केले आहे. यासाठी प्रतिनिधिक स्वरूपात पात्र महिलांनाही
या कार्यक्रमाला बोलावल्याची माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी यांनी
सांगितले.
No comments:
Post a Comment