‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट घरोघरी तिरंगा लावण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जळगाव , दिनांक 9 ऑगस्ट ( जिमाका ) : जिल्ह्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. तर 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्येकांनी आपल्या घरावर तिरंगा लावायचा आहे. अशा या अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली पर्वानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्ज्वल भावना कायमस्वरुपी मनात राहावी, यासाठी 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत गाव ते जिल्हास्तरावर दररोज विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या अभियानाची सुरुवात 9 ऑगस्टपासून सुरुवात झाली असून यानिमित्ताने प्रत्येक गावात व तालुक्याच्या ठिकाणीही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000000000
No comments:
Post a Comment