Wednesday, 7 August 2024

राज्य बाल हक्क संरक्षण

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा मार्फत
सुनावणीचे आयोजन शुक्रवार ०९ ऑगस्ट रोजी

जळगाव दिनांक 7 ऑगस्ट ( जिमाका ) : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचेकडे प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने ०९ ऑगस्ट २०२४ शुक्रवार रोजी आयोगामार्फत सुनावणीचे आयोजन करण्यात आलेले असून सदर सुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा मा. ॲङ सुशीबेन शाह, सचिव मा. डॉ. भालचंद्र चव्हाण (भा. प्र. से) आयोगाच्या मा.सदस्या अॅड निलिमा शांताराम चव्हाण, अॅड.संजय विजय सेंगर, अॅड प्रज्ञा सुदाम खोसरे, अॅड. जयश्री गुरुनाथ पालवे, सौ. सायली दिपक पालखेडकर, चैतन्य हरीश पुरंदरे तसेच आयोगातील अधिकारी प्रमोद बाडगी, श्रीमती माधवी भोसले, श्रीमती उज्वला होवाळ, अजय लोंढे हे उपस्थित असणार आहेत.
सदर सुनावणीचे अयोजन शुक्रवार दिनांक ०९ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे करण्यात आलेले आहे. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले आहे.

                     00000000 

No comments:

Post a Comment