Monday, 12 August 2024

शिष्यवृत्ती अर्ज

 शिष्यवृत्ती अर्ज २० ऑगस्ट, २०२४ पर्यत सादर करावेत  

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांचे आवाहन

जळगाव , दिनांक 12 ऑगस्ट ( जिमाका ) :  राज्य शासनाच्या महाडीबीटी (MAHA-DBT) पोर्टलवर सन 2023-24  च्या विद्यार्थ्याचे त्रुटीअभावी अर्ज अदयापी विदयार्थी लॉगीनवर प्रलंबित  त्यांनी  अर्ज दिनांक २० ऑगस्ट, २०२४ पर्यंत त्रुटींची पूर्तता करुन महाविदयालयाकडे  ऑनलाईन अग्रेषित करावेत असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे. 

  तसेच सन २०२३-२४ चे महाविदयालय स्तरावर प्रलंबित असलेले  सर्व  पात्र अर्ज दि.२५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांचेकडे ऑनलाईन अग्रेषित करावेत. सदर मुदत ही अंतीम असून यानंतर सन २४ चे अर्ज महाडीबीटी (MAHA-DBT) पोर्टलवरुन अग्रेषित करता येणार नाही. अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. 

            यासोबतच सन २०२४-२५ साठी ऑनलाईन नोंदणी महाडीबीटी (MAHA-DBT) पोर्टलवर दि.२६ जुलै, २०२४ पासून सुरू झाली असून विदयार्थ्यानी  शिष्यवृत्तीसाठी तात्काळ महाडीबीटी (MAHA-DBT) या पोर्टलवर नोंदणी करावी, असेही आवाहन सहायक आयुक्त योगेश पाटील समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे. 

000000000

No comments:

Post a Comment