Friday, 2 August 2024

महसुल सप्ताह दिना निमित्त दिनांक 05 ऑगष्ट 2024 रोजी

 महसुल सप्ताह दिना निमित्त 
दिनांक 05 ऑगष्ट 2024 रोजी
 सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रम राबविणेबाबत

 जळगाव, दिनांक 2 ऑगस्ट ( जिमाका ) :  जळगांव तालुकयातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/सैनिक विधवा/विरनारी/विरपिता व त्यांचे अवलंवित व सेवेत कार्यरत जवानांना कळविण्यात येते की राज्य सरकारने या वर्षी १ ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट हा महसुल सप्ताह आयोजित केला आहे. समाजातील सर्व घटकाना त्या दिवशी महसुली कामे यांचा लेखा जोखा तात्काळ जाग्यावर सादर होणार आहे या अनुषंगाने जळगाव जिल्हातील सर्व माजी सैनिक, शहीद सैनिकांचे कुटूंब व कार्यरत सैनिकांचे महसूल तसेच इतर विभागातील शासकीय कामे जलद रित्या व प्राधान्यान निर्गत करण्यासाठी सैनिक हो तुमच्या साठी कार्यक्रम दिनांक ०५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १२:०० वाजता तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी जळगाव कार्यालय येथे आयोजीत करण्यात येत आहे. आपल्या समस्या जसे की ७/१२. भुमापन घर संबधी जमीन मोजणी, भुमी अभिलेख, MSEB ग्रामपंचायत असेसमेंट' तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडील कामे साध्य करण्यासाठी या संधीचा फायदा जळगाव तालुक्यातील सैनिक व परिवार यानी करून घ्यावा व कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मा. श्रीमती शितल राजपूत, तहसिलदार तथा कार्यकारी दडाधिकारी जळगाव तथा श्री संजय गायकवाड सहा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

                                                                        00000000

No comments:

Post a Comment