मतमोजणीसाठी
नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी
यशस्वीपणे
जबाबदारी पार पाडावी
: प्रातांधिकारी शरद पवार
चाळीसगाव दि. 22 (उमाका वृत्तसेवा) : तालुक्यातील 7 गट व 14
गणाच्या मतमोजणीची प्रक्रिया 23 फेब्रुवारी, 2017 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरु
होणार असून या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविण्यात
आलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा
प्रातांधिकारी शरद पवार यांनी आयोजित प्रशिक्षण शिबीरात दिल्या.
23
फेब्रुवारी, 2017 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरु होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी
एकूण 28 टेबल लावण्यात आले असून एका गटासाठी दोन टेबल तर एका गणासाठी एक टेबल अशी
संरचना करण्यात आली आहे, तर टपाली मतमोजणीसाठी एक स्वतंत्र टेबल लावण्यात आला आहे.
यासाठी मतमोजणी करतांना गटासाठी असलेल्या उमेदवारास मिळालेली मते नोंदविण्यासाठी
पांढऱ्या रंगाचा तर गणासाठी असलेल्या उमेदवारास मिळालेली मते नोंदविण्यासाठी
गुलाबी रंगाचा फॉर्म तयार करण्यात आला आहे. यावेळी टेबलनिहाय मतमोजणी करतांना
संबंधित उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनीधी उपस्थित राहणार असून त्यांना मिळालेल्या मतांची
आकडेवारी दाखवून त्यांची खात्री झाल्यानंतर विहीत फॉर्मवर त्यांची स्वाक्षरी
घेण्यात यावी. तत्पुर्वी आलेल्या मतदान यंत्राचा क्रमांक हा आपल्याला मिळालेल्या
फॉर्मनुसार बरोबर असल्याची खात्री करुन सदर यंत्राचे सिल हे उमेदवार अथवा त्यांच्या
प्रतिनीधीसमोर उघडण्यात यावे. या व अशा अनेक सुचनाही प्रांताधिकारी श्री.पवार
यांनी उपस्थित मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी दिल्या.
मतमोजणी
कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविलेली
जबाबदारी व्यवस्थीत रित्या पार पाडण्यासाठी मतमोजणी यंत्राचे प्रात्याक्षिकही
यावेळी दाखविण्यात आले. तर मतमोजणी कामात कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा अथवा
टाळाटाळ केल्यास लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 चे कमल-134 अन्वये फौजदारी स्वरुपाची
कारवाई करण्यात येईल अशी तंबी देखील प्रांताधिकारी श्री.पवार यांनी यावेळी दिली.
जिल्हा
परिषद व पंचायत समितीची मतमोजणी प्रक्रिया य.ना.चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड
चाळीसगांव येथे सकाळी 10:00 वाजता सुरु होणार असून उमेदवारांसह उमेदवारांच्या
प्रतिनीधींना तर मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकारांना मतमोजणी
प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विहीत नमुन्यातील प्राधिकारपत्रांचे वितरण करण्यात
आले आहे. महाविद्यालयाच्या समोरच्या प्रवेशव्दारातुन केवळ उमेदवार व उमेदवारांचे
प्रतिनीधी यांनाच प्रवेश देण्यात येणार असून अधिकारी, कर्मचारी व पत्रकार यांना
महाविद्यालयाच्या मागील प्रवेशव्दाराने प्रवेश देण्यात येणार आहे. पत्रकारांसाठी
स्वतंत्र मिडीया कक्षही या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी
कुठलेही खाद्यपदार्थ तसेच मोबाईल जवळ बाळगता येणार नाही अशा सुचनाही प्रातांधिकारी
श्री.पवार यांनी यावेळी दिल्या.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment