जिल्हा परिषद व पंचायत
समिती सार्वत्रिक निवडणूक
चाळीसगांव
तालुक्यात 61.61 टक्के मतदान
चाळीसगांव,दिनांक 16 :- तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 7 गटासह पंचायत
समितीच्या 14 गणासाठी आज सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने शांततेत मतदान पार पडले. या निवडणूकीत तालुक्यातून
एकूण 61.61 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या
सार्वत्रिक निवडणूकीत चाळीसगांव तालुक्यातील 7 गटातून 24 तर 14 गणातून 51 उमेदवार
उभे होते. तालुक्यातून 2 लाख 46 हजार 247 मतदारांपैकी 1 लाख 51 हजार 719 इतक्या
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये पुरूष 81 हजार 546 तर महिला 70 हजार
173 मतदार असून तालुक्यातील एकूण मतदारांच्या तुलनेत एकूण 61.61 टक्के मतदानाची
प्रक्रिया शांततेत पार पडली.
गट निहाय झालेल्या
मतदानाची आकडेवारी व टक्केवारी याप्रमाणे
(1) कळमडू-बहाळ :
एकूण मतदार 33201 - झालेले मतदान 21200
- (टक्केवारी 63.85 %)
(2) दहिवद-मेहुणबारे
: एकूण मतदार 33688 – झालेले मतदान 19938
– (59.18 %)
(3) सायगांव-उंबरखेड
: एकूण मतदार 35822 – झालेले मतदान 23808
– (66.46 %)
(4) करगांव-टाकळी
प्रचा : एकूण मतदार 34073 – झालेले मतदान 17924
– (52.60 %)
(5) पातोंडा-वाघळी :
एकूण मतदार 32643 – झालेले मतदान 21480 – (65.80 %)
(6)
रांजणगांव-पिंपरखेड : एकूण मतदार 40052 –
झालेले मतदान 24559 – (61.32 %)
(7) देवळी-तळेगांव :
एकूण मतदार 36768 – झालेले मतदान 22810 – (62.04 %)
* * * * * * * *
No comments:
Post a Comment