भास्कराचार्य
गणित नगरी साकारण्यासाठी
वन
विभागाचा सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक
: जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल
चाळीसगाव दि. 18 (उमाका वृत्तसेवा) : चाळीसगाव तालुक्यातील
पाटणादेवी येथे भास्कराचार्यांच्या नावाने जागतिक दर्जाची गणित नगरी साकारण्यासाठी
वनविभागासह शिक्षण व सार्वजानिक बांधकाम विभागाचा सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी
रुबल अग्रवाल म्हणाल्या.
तहसिल कार्यालयाच्या सभागृहात भास्कराचार्य
गणित नगरीच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय वन
अधिकारी (वन्यजीव) औरगाबाद श्री.धामगे, सहाय्यक वन संरक्षक (वन्यजीव) औरंगाबाद
श्री.जगत, जिल्हा नियोजन अधिकारी, अधिक्षक अभियंता (सा.बा.) श्री.पांढरे,
प्रांताधिकारी शरद पवार, अपर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, तहसिलदार कैलास देवरे,
उप विभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस
निरीक्षक सुनिल गायकवाड, गट विकास अधिकारी श्री.वाघ, तालुका कृषी अधिकारी
श्री.राजपूत, प्रा.लक्ष्मीकांत पाठक, वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वन परिक्षेत्र
अधिकारी पाटणा एल.एम.राठोड यांच्यासह भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग, सार्वजानिक
बांधकाम, महावितरण, शिक्षणाधिकारी माध्यमिक आदि
विभागांचे प्रमुख या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी
बोलतांना श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, भास्कराचार्य गणित नगरी साकारतांना पर्यावरणाच्या
पोषकतेसह वन्यजीवाला हानी पोहचणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. वन विभागाच्या
नियमांचे काटेकोर पालन करावे. पर्यटकांचा विचार करुन सर्व सोयीसुविधा उपलब्ध केल्यास
या जागतिक दर्जाच्या गणित नगरीमुळे पर्यटन विकासालाही गती मिळू शकेल. भास्कराचार्य
मॅथ सिटीमुळे भावी पिढीला गणिताबद्दल आकर्षण, गणिताचे हसत-खेळत शिक्षण आणि संशोधन
करण्यास मोठा हातभार लागू शकेल, यासाठी सर्व विभागप्रमुखांनी समन्वयासह सकारात्मक
दृष्टीकोन ठेवून काम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी तयार करण्यात आलेल्या
आराखड्याचे व गणित नगरीवर आधारित चित्रफीतीचे सादरीकरण करण्यात आले तर
प्रा.ल.वी.पाठक, वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे व पाटण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी एल.एम.राठोड
यांनी परिसराची सखोल माहिती जिल्हाधिकारी श्रीमती.अग्रवाल यांना सादरीकरणातून दिली.
* * * * * * *
No comments:
Post a Comment