चाळीसगावात
रोजगार मेळाव्याचे आयोजन
बेरोजगारांनी
लाभ घ्यावा
:
प्र.ग.हरडे सहाय्यक संचालक
चाळीसगांव, दिनांक 13 :- तालुक्यातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची संधी
उपलब्ध व्हावी या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, जळगांव यांच्या वतीने आज दिनांक 14 डिसेंबर, 2016 रोजी सकाळी 10:00 वाजता
बापजी हॉस्पीटल, नगरपालीकेच्या बाजूला, चाळीसगांव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील बेरोजगारांनी मोठ्या संख्येने या रोजगार
मेळ्याव्यास उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन प्र.ग.हरडे, सहाय्यक संचालक, कौशल्य
विकास रोजगार व उद्योजकता, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
या मेळाव्यासाठी खाजगी आस्थापनांनी
त्यांचेकडील एकूण 180 रिक्तपदांची मागणी अधिसूचित केली असून नियोक्त्यांकडून
देण्यात येणाऱ्या वेतनासह इतर सवलतींबाबत रोजगार मेळाव्यात संबंधित कंपनीचे
अधिकारी माहिती देणार आहेत. तर बेरोजगार तरुणांना स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी
मुद्रा लोन विषयी महाराष्ट्र बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. रोजगार
मेळाव्यात उद्योजकांकडील विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची
असल्याने 10 वी, 12 वी उत्तीर्ण तसेच आय.टी.आय. व पदवीधरांनी रोजगार मेळाव्यास येतांना आपली शैक्षणिक
पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व इतर आवश्यक कागदपत्रांसह
उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक
संचालक श्री.हरडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment