चाळीसगावात
भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन
शेतकऱ्यांनी
लाभ घेण्याचे आवाहन
चाळीसगांव, दिनांक 22 :- तालुक्यातील
सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या 19 ऑक्टोंबर, 2016 च्या शासन
निर्णयानुसार तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तालुकास्तरावर सन 2016-17 या
खरीप पणन हंगामात किमान आधारभुत किमतीवर ज्वारी/बाजरी/मका या भरडधान्य खरेदीसाठी
शेतकरी सहकारी संघात भरडधान्य खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून या खरेदी
केंद्राचे उद्घाटन तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शेतकरी सहकारी
संघाचे चेअरमन शशीकांत साळुंखे, उपाध्यक्ष अभय सोनवणे, संचालक जालम पाटील,
तहसिलदार कैलास देवरे, भाऊसाहेब पाटील, शिवाजी आमले, किशोर देशमुख, नानासाहेब
पाटील, बापू राठोड, विश्वास चव्हाण, सुभाष पाटील, किशोर देशमुख, नानासाहेब पाटील,
सुर्यकांत वाघ, जयाजी भोसले, गोडावून
व्यवस्थापक राजेंद्र कुऱ्हेकर आदि उपस्थित होते
या भरडधान्य खरेदी
केंद्रावर खरेदी करण्यासाठी अभिकर्ता म्हणून जिल्हा मार्केटींग फेडरेशन तर उप
अभिकर्ता म्हणून शेतकरी सहकारी संघ लि. चाळीसगाव यांची नियुक्ती करण्यात आलेली
आहे. सदरची खरेदी ही महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे खडकी बु. शिवारातील गोदामात
करण्यात येणार असल्याचेही तहसिलदार कैलास देवरे यांनी कळविले आहे.
तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर
भरडधान्य विक्री करण्यासाठी आणतांना स्वच्छ व कोरडे (विक्री योग्य) तसेच ज्वारी,
बाजमी, मका यांची 14 टक्के इतके आद्रता असलेलेच धान्य खरेदी करण्यात येणार
असल्याची नोंद घ्यावी, व अधिकाधिक शेतकऱ्यांनी या भरडधान्य खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा
असे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment