चाळीसगावात
राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन
चाळीसगांव, दिनांक 22 :- तालुका प्रशासनाच्या वतीने शनिवार
दिनांक 24 डिसेंबर, 2016 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. उप
विभागीय अधिकारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात सकाळी 11:00
वाजता तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार
असून तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
तहसिलदार कैलास देवरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
राष्ट्रीय
ग्राहक दिनाचे औचित्य साधत ग्राहकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टीकोनातून तहसिल
कार्यालयातील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात
ग्राहक संरक्षण कायदा 1986 यावर प्रबोधनपर कार्यक्रम व ग्राहक जागृती विषयक
प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी वजन माप, अन्नभेसळ, विज
वितरण, घरगुती वापरावयाचा गॅस संबंधीच्या प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी
कळविले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव
एज्यकेशन सोसायटीचे सचिव बाबासाहेब चंद्रात्रे,
तालुका व्यापारी असो. अध्यक्ष प्रदीप देशमुख, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, पंचायत
समिती सभापती श्रीमती आशालता साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र
पाटील, ग्रंथमित्र तथा ग्राहक संरक्षण समितीचे आण्णा धुमाळ, तालुकाध्यक्ष रमेश सोनवणे, लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती
आशालता साळुंखे
हे उपस्थित राहणार आहेत.
तरी
आयोजित कार्यक्रमातील चर्चासत्र व प्रदर्शनाचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा असे
आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment